मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांमुळे प्रचंड प्रमाणात वायू प्रदूषण वाढत आहे. साहजिकच यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून पेट्रोल-डिझेल किमतीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याने अनेक नागरिक पुन्हा एकदा सायकली कडे वळत आहेत परंतु सायकल चालविणे फारसे सोपे नसते त्यामुळे ई सायकल हा पर्याय उपलब्ध होत आहे.
सामान्य सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करण्याची संधी मिळत आहे. Dasasual Gojiro Mobility – Premium Electric Performance Bikes कंपनीने आपल्या प्रकारचा हा पहिला “स्विच” प्रोग्राम भारतात लॉन्च केला आहे. या मोहिमेत, कंपनी ग्राहकांना कोणतीही सामान्य सायकल आणण्याची आणि नवीन गोजिरो इलेक्ट्रिक बाइकने बदलण्याची ऑफर दिली आहे. सदर मोहीम दि. 10 जानेवारी ते 9 एप्रिल 2022 पर्यंत सुरू राहणार आहे . ज्यांना यात सहभागी व्हायचे आहे, ते पुढील 3 महिन्यांसाठी याचा लाभ घेऊ शकतात. गोजिरो मोबिलिटी ई-बाईक निर्माता 7000 ते 25000 रुपयांच्या कोणत्याही ब्रँडची सायकल या ऑफरमध्ये रूपांतरित करत आहे. या ई बाईकची श्रेणी 34,999 ते 45,999 रुपये आहे.
या मोहिमेमुळे गोजिरो कंपनीला देशाच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भागात आपला प्रचार आणि प्रसार करण्यास मदत होईल.
सदर इलेक्ट्रिक सायकली अनेकांच्या पसंतीस उतरत असून त्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. सामान्य नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयीच्या वाढत्या चिंतेमुळे ई-बाईकचा वापर किंवा उपयोग करण्याची जागरूकता आणि मागणी वाढली आहे. याशिवाय, अशा ग्राहकांची संख्या देखील सतत वाढत असून ई-बाईकबद्दल चौकशी करत आहेत आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेतल्यानंतर ई-बाईकला त्यांचे पुढील अपग्रेड मानत आहेत.
गोजिरो मोबिलिटीचे सह-संस्थापक सुमित रंजन म्हणाले, या मोहिमेचा उद्देश हा आहे की, आम्ही जमा झालेल्या सर्व बाईक दुरुस्त करून त्या अन्य कामासाठी वापरणार आहोत. हे छोटेसे पाऊल आपल्याला स्वच्छ आणि उत्सर्जन मुक्त गतिशीलतेच्या मोठ्या ध्येयाकडे घेऊन जाईल. सायकल वापरकर्ते नेहमी त्यांची निवड अद्वितीय करण्यासाठी काहीतरी वेगळे निवडण्याचा प्रयत्न करतात. या मोहिमेची संपूर्ण कल्पना म्हणजे काहीतरी नवीन ठरवा.
अनेक नागरिक शतकानुशतके पारंपारिक सायकल चालवत आहेत, आता गोजिरोच्या ट्रेंडी आणि प्रगत ई-बाईकवर स्विच करण्याची वेळ आली आहे. सायकल वापरकर्त्यांच्या सर्व नियमित आणि ऑफ-रोड गरजा पूर्ण करण्यासाठी आमची X सीरीज eBikes पुरेशी आहेत, तसेच त्यांना इलेक्ट्रिक ड्राईव्ह ट्रेनचा अंतिम आराम देखील देतात, असेही ते म्हणाले.