नवी दिल्ली – नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज करणे महत्त्वाची गोष्ट असते, त्याहीपेक्षा नोकरी मिळवणे ही आणखीनच अत्यंत महत्त्वाची आणि कठीण गोष्ट मानली जाते. परंतु राजीनामा देणे हे चांगले मानले जात नाही. परंतु दुसर्या एखाद्या नोकरी चांगली ऑफर आली तर राजीनामा द्यावा लागतो. परंतु राजीनामा देताना बॉसचे आभार मानले जातात.
सध्याच्या काळात चांगली नोकरी मिळविण्यासाठी अनेक तरूण कठोर आणि परिश्रमपूर्वक अभ्यास करतात. यानंतर विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि इंटर्नशिप देखील करतात, त्यातून त्यांचे कौशल्य आणखी वाढवून ते बॉसची मर्जी संपादन करतात. त्याच वेळी, त्यांना करिअरमध्ये आणखी चांगली ऑफर मिळते तेव्हा जुनी नोकरी सोडणे भाग असते. यासाठी बॉसला राजीनामा लिहून सांगावे लागते की, आता तो कंपनीत काम करू शकत नाही, पण जर हा राजीनामा टॉयलेट पेपरवर लिहिला असेल तर…
एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, एका व्यक्तीने टॉयलेट पेपरवर लिहून आपल्या बॉसला दिले आहे. हा राजीनामा लुईस नावाच्या व्यक्तीचा आहे. लुईस यांनी नुकताच त्यांच्या जुन्या कंपनीचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लुईस यांनी राजीनाम्यात लिहिले आहे की, मी 25 तारखेला रवाना होणार आहे. इतकेच नव्हे तर यासाठी कर्मचाऱ्याने त्यावर एक व्यंगचित्रही तयार केले असून, त्यांनी हे व्यंगचित्र स्वत:च्या रूपात सादर केले आहे.
लुईस यांनी लिहिले की, ‘आज मी माझा राजीनामा सादर करत आहे.’ मात्र, लुईस यांनी टॉयलेट पेपरमध्ये राजीनामा का लिहिला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. त्याचवेळी त्यांचा राजीनामा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लुईस यांच्या या राजीनाम्यावर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या या पोस्टला आतापर्यंत 70 हजारांहून अधिक व्यक्तींनी लाईक केले आहे. त्याचवेळी त्यांच्या या पोस्टवर मोठ्या संख्येने कमेंट येत आहेत. याआधी 2018 मध्ये डॉमिनोजच्या एका कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवर लिहून राजीनामा दिला होता.