India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ग्राहकांच्या सुविधेसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

India Darpan by India Darpan
July 29, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक: ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी शनिवार व रविवारी ३० व ३१ जुलै २०२२ या साप्ताहिक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. त्यानुसार नाशिक परिमंडलांतर्गत नाशिक जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी सुरु राहतील. या उपलब्ध सुविधेसह डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यासोबतच थकबाकीदार ग्राहकांनी वीज पुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी आपल्या विदुयत बिलाचा भरणा वेळेत करावा. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अँप (App) वर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते, या डिजिटल माध्यमांचा वापर करून घरबसल्या वीजबिल भरता येईल. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.


Previous Post

सोसायटीतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल, संशयितास अटक

Next Post

पंतप्रधान मोदी साधणार या ५ जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद

Next Post

पंतप्रधान मोदी साधणार या ५ जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group