नाशिक : संजय गांधी नगर भागात सोसायटीतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. अश्लिल हावभाव करीत एकाने हे कृत्य केले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. गौतम सोनवणे (३२) असे संशयिताचे नाव आहे. संशयित सोनवणे राहत असलेल्या सोसायटीतील ११ वर्षीय पिडीत मुलगी गुरूवारी आपल्या घरी जाण्यासाठी जिना चढत असतांना ही घटना घडली. दुस-या माळयावरील संशयिताने घराचा दरवाजा उघडा करून अश्लिल हावभाव करीत जवळ बोलावून मुलीचा विनयभंग केला. ही बाब मुलीने घरीजावून आपल्या आईकडे कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.