शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

खाद्यतेलाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; इतक्या रुपयांनी दर घसरणार

फेब्रुवारी 13, 2022 | 3:50 pm
in मुख्य बातमी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

मुंबई/पुणे/नाशिक (इंडिया दर्पण वृतसेवा) – एकीकडे महागाईचा भस्मासूर वाढत असतानाच काही प्रमाणात सर्वसामान्य नागरीकांना दिलासा मिळावा म्हणून गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. आता सरकारने कच्च्या पामतेलावरील प्रभावी सीमाशुल्क ५.५ टक्क्यांवर आणले आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होण्यास आणि ग्राहकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर आता क्रूड पाम तेलावर ५ टक्के आकारला जाईल, आतापर्यंत ७.५ टक्के होता. या कपातीनंतर कच्च्या पाम तेलावरील प्रभावी सीमाशुल्क ८.२५ टक्क्यांऐवजी ५.५ टक्के होईल. काही व्यापाऱ्यांच्या मते, या कपातीमुळे भाव २८० रुपये प्रति क्विंटलने कमी होऊ शकतात. यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्येही सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केली होती. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत देशभरात खाद्यतेलाच्या किरकोळ किमती जागतिक बाजाराच्या अनुषंगाने जास्त आहेत, पण ऑक्टोबरपासून त्यामध्ये घसरण होत आहे. एकंदरीत या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, मागील वर्षी दिवाळी सणाच्या नंतर तत्कालीन किमतींच्या तुलनेत शेंगदाणे आणि मोहरीच्या तेलाच्या किरकोळ किमती १.५० ते ३ रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत, तर सोया आणि सूर्यफूल तेलाच्या किमती आता ७ ते ८ रुपये प्रति किलो दराने खाली आल्या आहेत.

नवीन वर्षात बजेट सादर करण्यापुर्वी यंदा जानेवारी महिन्यांपासून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. सरकारने पाम तेलावरील आयात शुल्कात प्रती टन ८००० रुपयांची म्हणजेच११२ डॉलरने कपात केली आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या किमती कमी होतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचना जारी केली आहे. ज्यात क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क ८६ डॉलर प्रती टनामागे कमी करण्यात आले आहे. या कपातीनंतर एक टन क्रूड पाम तेलावर आता ११३६ डॉलर शुल्क आकारले जाणार आहे.

क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात देखील सरकारने प्रती टन ३७ डॉलरची कपात केली असून ते १४१५ डॉलर केले आहे. पाम तेलावरील आयात शुल्क ११२ डॉलरने कमी होऊन ११४८ डॉलर प्रती टन झाले आहे. आयात शुल्कात कपातीमुळे तेल आयातीचा खर्च कमी होणार आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. भारतात दरवर्षी एकूण गरजेच्या ६० टक्के खाद्यतेल आयात होते. हे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. यामुळे तीन महिने आधी सरासरी ११० ते १२५ रुपयांदरम्यान असलेले खाद्यतेल आता १४०-१६० रुपयांच्या घरांत गेले आहे. सध्या खाद्यतेलाची आयात घटली आहे. सध्या नवी दिल्लीत सध्या पाम तेलाचा भाव प्रती लीटर १२० ते १३० रुपये आहे. सोयाबीन तेलाचा भाव १३० ते १४० रुपये आहे. सनफ्लॉवर तेलाचा भाव १४० ते १५५ रुपये आहे. तर शेंगदाणा तेलाने १६०ते १८० रुपयांची पातळीवर आहे.

नाशिक येथील किराणा बाजारातील खाद्यतेलाच्या किमतीबाबत माहिती घेतली असता स्थानिक दुकानदारांनी सांगितले की, सोयाबीन तेल 133 ते 135 रूपये, शेंगदाणा तेल 160 ते 165 रुपये, सूर्यफूल तेल 140 ते 150 रुपये, पामतेल 125 ते 128 रुपये असा सर्वसाधारण दर आहे. या दरांमध्ये साधारणत : आठवड्याला एक ते तीन रुपयाचा फरक पडतो, असे ही अशी माहिती राजेश्वर किरणाचे मालक विशाल सोनवणे यांनी दिली. म्हणजे अद्याप तेलाचे दर कमी झाले नसले तरी कदाचित दर कमी झाल्यास ग्राहकांना त्याचा फायदा होईल असेही दुकानदार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अलीकडेच केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठवणुकीची मर्यादा ३० जून २०२२ पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. हे स्पष्ट करा की स्टोरेज मर्यादा आदेश केंद्र सरकार आणि सर्व राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठवण, वितरणाचे नियमन करण्याचे अधिकार देतो. यामुळे देशातील खाद्यतेल आणि तेलबियांचा साठा रोखण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना चालना मिळेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वडांगळीच्या सुप्रसिद्ध सतीमाता-सामतदादा यांचा यात्रोत्सवाबाबत झाला हा निर्णय

Next Post

आमरण उपोषणाबाबत अखेर अण्णा हजारे यांनी घेतला हा निर्णय

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
anna hajare1

आमरण उपोषणाबाबत अखेर अण्णा हजारे यांनी घेतला हा निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011