नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसामान्य नागरिकांना अतिशय दिलासादायक वृत्त आहे. कारण, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर ही दिलासा देणारी बातमी आहे. आता खाद्यतेलाचे दर आणखी साधारणतः १५ रुपयांनी कमी होणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना तसेच गृहिणींना दिलासा मिळणार आहे. एकीकडे गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने महागाई वाढली असताना हा एक प्रकारे दिलासाच आहे. केंद्र सरकारने या संदर्भात खासगी तेल उत्पादक कंपन्यांना दर नियंत्रित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जगातील काही देशांमधील अस्थिर राजकीय परिस्थिती तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे गेल्या काही महिन्यांत वधारलेल्या खाद्यतेलाच्या किमती आता आणखी कमी होण्याची शक्यता आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलबिया आणि धान्याच्या किमती वाढल्यामुळे देशांतर्गत खाद्यतेलाचे भावही भडकले होते. परंतु केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या महिन्यात कंपन्यांनी तेलाचे दर सुमारे १५ रुपयांनी कमी केले होते. हे दर आणखी कमी करण्याची आवश्यक असल्याचे सरकारचे सांगणे आहे. त्यासाठी खाद्यतेल कंपन्यांसोबत एक बैठकही घेण्यात आली. त्यामध्ये खाद्यतेलाचे दर कमी करण्याबाबत केंद्र सरकारने कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता खाद्यतेलाच्या किंमती आणखी सुमारे १५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत खाद्यतेलाच्या किमतीत कपात करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने खाद्यतेल कंपन्यांना एका आठवड्यात तेलाचे दर कमी करण्याबाबत आदेश दिले आहेत. वास्तविक पाहता देशात महागाईचा भडका उडाला आहे. अन्नाधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि इंधनापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. मात्र वाढत्या महागाईत गॅस सिलेंडरचे भाव वाढले असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गेल्या महिनाभरात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये ९ टक्क्यांनी घसरण झाली आहे. खाद्यतेल स्वस्त झाले असून, पुढील काही महिन्यांमध्ये खाद्यतेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने किमती कमी झाल्या आहेत.
गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल तेल, मोहरीचे तेल, पाम ऑईल आणि नारळ तेलाच्या दरात दोन ते तोरा टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. त्याचा परिणाम हा भारतीय बाजारपेठेवर देखील झाला असून, सूर्यफूलाचे तेल वगळता भारतात इतर तेलाचे दर स्वस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भारतात खाद्यतेलाच्या दरात मोठी तेजी पहायला मिळत होत. त्यामागे दोन कारणे होती. एक तर रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध तर दुसरे इंडोनेशियाने अचानक बंद केलेली पाम तेलाची निर्यात. मात्र आता पुन्हा एकदा इंडोनेशियाकडून खाद्य तेलाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे भारतात होणारा तेलाचा पुरवठा वाढला आहे.
रिझर्व्ह बँकेने वाढवलेल्या रेपो रेटचा परिणाम देखील दिसून येत आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पुढील काळात खाद्यतेलाचे दर आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यात येत आहेत. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने किमती कमी झाल्या आहेत. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल तेल, मोहरीचे तेल, पाम ऑईल आणि नारळ तेलाच्या दरात ३ ते १३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. त्याचा परिणाम हा भारतीय बाजारपेठेवर देखील झाला असून, सूर्यफूलाचे तेल वगळता भारतात इतर तेलाचे दर स्वस्त झाले आहेत.
Edible Oil Prices Will reduce Union Government Meet with producers Relief to Common Man