ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करताना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आडनावच बदलून टाकले आहे. भल्या मोठ्या या होर्डिंग्जवर देवेंद्र फडणवीस ऐवजी देवेंद्र फर्नांडिस असे नाव टाकण्यात आले आहे. त्यामुळे सध्या हे होर्डिंग्ज राज्यभर चर्चेचा विषय बनले आहेत.
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर अनेकांनी संपूर्ण राज्यभरात देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदनपर पोस्टर आणि शुभेच्छा देणारे भव्य फलक तथा बॅनर लावले. होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरुद्धच्या बंडापासून राज्यातील नवीन सरकार स्थापन होण्यात देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी नियोजनबद्ध रणनीती आखून एकनाथ शिंदे यांचे बंड कुठेही फसणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली.
देवेंद्र गंगाधर फडणवीस हे भारतीय जनता पक्षातील महत्वाचे नेते आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. ते नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.
महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वेगाने घटना घडत आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या समर्थकांनी शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. मात्र, या बॅनर्सवर चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव चुकीच्या पद्धतीने लिहण्यात आले आहे. या बॅनर्सवर देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवेंद्र फर्नांडिस असा करण्यात आला आहे. एकीकडे भाजपश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्रीपदावर पदावनाती करुन देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटल्याची चर्चा सुरु असताना आता फलकांवर त्यांचे नावही चुकीच्या पद्धतीने लिहले गेले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या बॅनर्सची चर्चा रंगली आहे.
मीरा रोड येथील शांतीनगर भागातील जैन मंदिराच्या परिसरात हे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनर्सवरील देवेंद्र फर्नांडिस हा उल्लेख सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. स्वीकृत नगरसेवक विक्रम प्रतापसिंह यांनी हे बॅनर्स लावले होते. या बॅनर्सचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. या सगळ्यामुळे सोशल मीडियावर मिम्स तयार करणाऱ्यांना संधी मिळाली आहे.
फडणवीस यांनी २०१९ छुप्या पद्धतीने सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची नोंद आहे. तेव्हा देखील भाजप समर्थकांनीही बॅनरबाजी केली होती. पण ही बॅनरबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. स्वीकृत नगरसेवक विक्रम प्रतापसिंह यांनी फडणवीसांना शुभेच्छा देताना त्यांच आडनावच बदल केला.
फडणवीस यांनी 2019 नंतर 80 तास मुख्यमंत्रीपद सांभाळले, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले मागच्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते पद भूषवले. त्यानंतर आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असतील, ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.
Mumbai Blessing Hoarding Devendra Fadanvis Surname Change Fernandis Politics