विशेष प्रतिनिधी, मुंबई
ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचा Amazon Savings Day Sale आजपासून (९ जून) सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहक ४० टक्के सवलतीवर स्मार्टफोन आणि अॅसेसरीज खरेदी करू शकणार आहे. हा चार दिवसीय सेल १२ जूपर्यंत सुरू राहील. यादरम्यान नो-कॉस्ट EMI सह अतिरिक्त सवलत आणि बँक ट्रॅन्झॅक्शन ऑफरवर ग्राहक स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. सेलमध्ये Realme, Samsung, Vivo, Xiaomi आणि इतर स्मार्टफोन उपलब्ध असतील.
स्मार्टफोनची स्वस्तात खरेदी
सेलमध्ये OnePlus 9R स्मार्टफोन २ हजार रुपये एक्सचेंज ऑफरमध्ये ग्राहक खरेदी करू शकतील. १,७५० रुपयांच्या डिस्काउंटवर ऑफर आणि १००० रुपयांच्या सूटवर Oppo F17 स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १६,९९० रुपयांमध्ये मिळेल. Oppo F19 Pro Plus 5G हा स्मार्टफोन २५,९९० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. Amazon वरून HDFC बैंक कार्डद्वारे ३००० रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटवर खरेदी करू शकणार आहे.
Realme X7 च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या प्रकाराला १९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता येणार आहे. एचडीएफसी कार्डद्वारे खरेदी केल्यास १००० रुपयांची सवलत मिळेल. तसेच Realme Narzo 30A स्मार्टफोन एचडीएफसी कार्डद्वारे ८,०५० रुपयांच्या एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी करू शकता येणार आहे.
Mi 10i 5G स्मार्टफोन स्वस्त
Redmi Note स्मार्टफोनचा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा प्रकार १०,९९९ रुपयांमध्ये मिळतो. या खरेदीवर ५०० रुपयांची सवलत दिला जात आहे. तसेच एचडीएफसी कार्डद्वारे खरेदीवर ७५० रुपयांची सवलत दिली जात आहे. फोनवर १०,३०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. दोन हजारांच्या एक्सचेंज ऑफरमध्ये Mi 10i 5G स्मार्टफोन खरेदी केला जाऊ शकतो. ६ जीबी रॅम आणि १२ जीबी रॅम हे व्हेरिएंट २१,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल.










