अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर महासेल; या वस्तूंवर मिळणार भरघोस सूट

विशेष प्रतिनिधी, मुंबई
ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचा  Amazon Savings Day Sale आजपासून (९ जून) सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहक ४० टक्के सवलतीवर स्मार्टफोन आणि अॅसेसरीज खरेदी करू शकणार आहे. हा चार दिवसीय सेल १२ जूपर्यंत सुरू राहील. यादरम्यान नो-कॉस्ट EMI सह अतिरिक्त सवलत आणि बँक ट्रॅन्झॅक्शन ऑफरवर ग्राहक स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. सेलमध्ये  Realme, Samsung, Vivo, Xiaomi आणि इतर स्मार्टफोन उपलब्ध असतील.
स्मार्टफोनची स्वस्तात खरेदी
सेलमध्ये OnePlus 9R स्मार्टफोन २ हजार रुपये एक्सचेंज ऑफरमध्ये ग्राहक खरेदी करू शकतील.  १,७५० रुपयांच्या डिस्काउंटवर ऑफर आणि १००० रुपयांच्या सूटवर  Oppo F17 स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १६,९९० रुपयांमध्ये मिळेल. Oppo F19 Pro Plus 5G हा स्मार्टफोन २५,९९० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. Amazon वरून HDFC बैंक कार्डद्वारे ३००० रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटवर खरेदी करू शकणार आहे.
 Realme X7 च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या प्रकाराला १९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता येणार आहे. एचडीएफसी कार्डद्वारे खरेदी केल्यास १००० रुपयांची सवलत मिळेल. तसेच  Realme Narzo 30A स्मार्टफोन एचडीएफसी कार्डद्वारे ८,०५० रुपयांच्या एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी करू शकता येणार आहे.
Mi 10i 5G स्मार्टफोन स्वस्त
Redmi Note स्मार्टफोनचा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा प्रकार १०,९९९ रुपयांमध्ये मिळतो. या खरेदीवर ५०० रुपयांची सवलत दिला जात आहे. तसेच एचडीएफसी कार्डद्वारे खरेदीवर ७५० रुपयांची सवलत दिली जात आहे. फोनवर १०,३०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. दोन हजारांच्या एक्सचेंज ऑफरमध्ये  Mi 10i 5G स्मार्टफोन खरेदी केला जाऊ शकतो. ६ जीबी रॅम आणि १२ जीबी रॅम हे व्हेरिएंट २१,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

फ्लिपकार्टचा सेल १३ जूनपासून
Flipkart Big Saving Days Sale ची सुरुवात १३ जूनपासून होणार आहे. या डीलमध्ये स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, परिधान करणार्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर मोठी सवलत दिली जात आहे.  Flipkart चा हा सेल १६ जूनपर्यंत सुरू राहील. या सेलमध्ये एसबीआय कार्डद्वारे खरेदी करणार्यांना १० टक्के सवलत मिळेल.  Flipkart Sale मध्ये  Google Pixel 4a, iPhone 11 Pro, Motorola Razr 5G, Samsung Galaxy F12 और Asu ROG Phone 3 सारखे स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. चारदिवसीय सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टच्या खरेदीवर ८० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे.  Flipkart Plus  सदस्यांसाठी हा सेल १२ जूनच्या मध्यरात्री १२ वाजेपासून सुरू होईल. सामान्य ग्राहकांसाठी तो १३ जूनपासून सुरू होईल.
या स्मार्टफोनवर डिस्काउंट
Flipkart Big Saving Days Sale साठी एक वेगळी मायक्रोसाइट बनविण्यात आली आहे. तिथे  ROG Phone 3 स्मार्टफोन ४६,९९९ रुपयांऐवजी ४१,९९९ रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. सेलमध्ये  Samsung Galaxy स्मार्टफोन १०,९९९ रुपयांऐवजी डिस्काउंटवर ९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता येईल. Flipkart कडून  Google Pixel 4a स्मार्टफोन २६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.  iQOO 3 हा स्मार्टफोन ३४,९९० रुपयांऐवजी २४९९० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. Motorola Razr 5G हा स्मार्टफोन १,०९,९९९ रुपयांऐवजी ८९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. iphone 11 Pro हा स्मार्टफोन ७९,९९९ रुपयांऐवजी ७४,९९९ रुपयांना मिळेल.  iPhone XR हा स्मार्टफोन ४१,९९९ ऐवजी ३९,९९९ रुपयांना मिळेल. त्याशिवाय  iPhone SE (2020) हा स्मार्टफोन ३२,९९९ रुपयांऐवजी ३१,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
इलेक्ट्रॅनिक डिव्हाइसवर ८० टक्के सवलत 
Flipkart सेल मध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि अॅसेसरीज ८० टक्के डिस्काउंटमध्ये खरेदी करता येणार आहे. स्मार्टवॉच ६० टक्के डिस्काउंटवर मिळेल. टॅबलेट ५० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट, डेस्कटॉप पीसी आणि लॅपटॉपवर ३० टक्के डिस्काउंट असेल. टीव्हीवर ७० टक्के डिस्काउंट मिळेल. एसबीआय कार्डद्वारे खरेदीवर १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे.