नाशिक – जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर शनिवार, ८ जानेवारी २०२२ रोजी होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी दिली आहे. गेल्या वेळेस झालेली ही सभा शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यामुळे चांगलीच वादळी ठरली होती. पण, यासभेनंतर वाद संपले होते. त्यामुळे ऑनलाईन सभेत वादाची शक्यता कमी आहे. पण, एखादा कळीचा मुद्दा उपस्थितीत झाला तर ही सभा वादळी होऊ शकते.
शनिवारी ८ जानेवारी २०२२ रोजी होणारी पूर्वनियोजित जिल्हा नियोजन समितीची बैठक सकाळी १०:३० वाजता होणारी बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात होणार होती. परंतु जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर ही बैठक आता ऑनलाईन होणार आहे. सर्व सन्माननीय सदस्य व कार्यान्वयीन यंत्रणांना बैठकीची लिंक उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहाच्या आवारात कुणीही गर्दी करू नये, असे आवाहनही जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी कळविले आहे.