देवळाली कॅम्प – येथील कवी प्रशांत धिवंदे यांनी देवळाली कॅम्प शहराची महती सांगणारी ‘रम्य देवळाली माझी ‘ ही कविता रचली आहे. ही कविता रविवार २७ रोजी पोस्टर रूपाने प्रकाशित होत आहे. देवळालीतील विविध स्थानाचे महत्व या कवितेतून अधोरेखित करण्यात आले आहे. या पोस्टरवर धिवंदे यांनी काढलेली फोटोंनी छापण्यात आले आहे. कवी, अभिनेते, गीतकार राजेंद्र उगले यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार हेमंत गोडसे, द्वाराचार्य रामकृष्णदासजी महाराज लहवितकर,आमदार सरोज अहिरे,रिपाइं नेते विश्वनाथ काळे,संजय भालेराव आदी मान्यवरांच्या हस्ते येथील गुरुद्वारा रोडवर असलेल्या कॅन्टोन्मेंट हायस्कुल शेजारील ज्ञान मंदिर सभागृहात मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोविडच्या नियमाचे पालन करत प्रकाशित करण्यात येणार आहे. नाशिकसह विविध गावांवर कविता रचण्यात आलेल्या आहे. मात्र ऐतिहासिक महत्व व निसर्गाचे वरदान लाभलेल्या देवळाली कॅम्पचे महत्व विशद करणारी ही पहिलीच कविता असल्याचे कवी प्रशांत धिवंदे यांनी सांगितले आहे.