India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दिल्लीतील आमदारांचा पगार वाढला! आता दर महिन्याला मिळणार एवढे हजार रुपये

India Darpan by India Darpan
March 13, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतील आमदारांचे वेतन आणि भत्ते वाढवण्यास राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाली आहे. यासोबतच दिल्लीतील सर्व आमदारांचा पगार आता ६६ टक्क्यांनी वाढला आहे. आता दिल्लीच्या आमदाराला ९० हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. दिल्लीतील आमदारांचे पगार यापूर्वी ५४ हजार रुपये होते.

पगारवाढीच्या या प्रस्तावाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर विधी, न्याय व विधिमंडळ कामकाज विभागाने पगारवाढीची अधिसूचना जारी केली आहे. आता मुख्यमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांना पगार आणि भत्त्यांसह एकूण 1.70 लाख रुपये दरमहा मिळणार आहेत, तर आधी त्यांना ७२ हजार रुपये मिळत होते. विशेष म्हणजे ४ जुलै २०२२ रोजी दिल्ली विधानसभेत या पगारवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

१२ वर्षांनी वाढ
दिल्लीतील आमदारांचा पगार तब्बल १२ वर्षांनंतर वाढला आहे. विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १४ फेब्रुवारी २०२३ पासून आमदारांच्या वाढीव वेतनाची प्रणाली लागू होईल. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जुलै महिन्यात वेगळी विधेयके मंजूर करून पगारवाढीचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. प्रसाराचा विचार केल्यानंतर, राष्ट्रपतींनी १४ फेब्रुवारीला त्यास मंजुरी दिली आहे, त्यामुळे आमदारांच्या पगारात ६६ टक्के वाढ झाली आहे.

असा मिळतो पगार
आमदारांचे मूळ वेतन पूर्वी १२ हजार होते ते आता ३० हजार झाले आहे. दैनिक भत्ता १००० होता तो आता १५०० झाला आहे. मुख्यमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते यांचे मूळ वेतन १८ हजारांवरून ६० हजार झाले आहे. इतकेच नाही तर याशिवाय आमदारांना वार्षिक १ लाख रुपये प्रवास भत्ता मिळणार आहे, जो आतापर्यंत ५० हजार रुपये होता. दिल्लीतील आमदारांना प्रत्येक टर्ममध्ये लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल खरेदीसाठी १ लाख रुपये मिळणार आहेत.

Delhi MLA Salary Allowance Increased


Previous Post

या कृषिमंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याविरोधात मविआचे आमदार आक्रमक (Video)

Next Post

धक्कादायक! सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे अंडरवर्ल्ड कनेक्शन; ‘त्या’ पार्टीत होता दाऊद अब्राहिमचा मुलगा

Next Post

धक्कादायक! सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे अंडरवर्ल्ड कनेक्शन; 'त्या' पार्टीत होता दाऊद अब्राहिमचा मुलगा

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group