India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धक्कादायक! सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे अंडरवर्ल्ड कनेक्शन; ‘त्या’ पार्टीत होता दाऊद अब्राहिमचा मुलगा

India Darpan by India Darpan
March 13, 2023
in मनोरंजन
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चित्रपट अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात थेट अंडरवर्ल्डचे कनेक्शन असल्याचे पुढे आले आहे. पहिल्या मजल्यावरील खोलीत असताना कौशिक यांच्या छातीत दुखू लागले. दुखण्यामुळे ते पहिल्या मजल्यावरून खाली उतरले आणि स्वत:च्या पोर्शे गाडीत बसले. फार्म हाऊसमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

कापशेरा पोलिसांनी फार्म हाऊसमधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर जप्त केले आहेत. याशिवाय या प्रकरणाच्या तपासासाठी निरीक्षकांच्या देखरेखीखाली आठ सदस्यीय पथक तयार करण्यात आले आहे. या टीमने रविवारी फार्म हाऊसला भेट दिली होती. सतीश कौशिकचा होळी पार्टीत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो हिंदी गाण्यावर डान्स करत आहे. त्याने पांढरा कुर्ता-पायजमा घातला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक डान्स करतानाही दिसत आहेत. असे सांगण्यात येत आहे की, अभिनेत्याने पार्टीत सुमारे ४५ मिनिटे डान्स केला.

जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, होळी पार्टीला २० ते २२ जणांनी हजेरी लावली होती. तीन वाजता पार्टी संपली. सायंकाळी पाचपर्यंत सर्वजण फार्महाऊसवरून आपापल्या घरी गेले होते. सतीश कौशिक यांना दुपारी १२.१० वाजता छातीत दुखू लागले. यानंतर त्यांनी त्यांच्या व्यवस्थापकाला माहिती दिली. मॅनेजरच्या मदतीने ते स्वतः पायऱ्यांवरून खाली उतरले आणि खाली आले.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांच्या खोलीतून डायझिन आणि पोट साफ होण्याची बाटली सापडली आहे. याशिवाय रक्तदाब आणि साखरेची औषधे सापडली आहेत. मात्र, ही औषधे त्यांच्या व्यवस्थापकाकडेच राहिली. अभिनेता सतीश कौशिक हे चित्रपट बनवणार होते, असा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. या चित्रपटाच्या डीलसाठी ते विकास मालूशी बोलण्यासाठी फार्म हाऊसवर गेले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी याप्रकरणी अहवाल मागवला आहे. अतिरिक्त पोलिस राजीव कुमार आणि एसीपी व्हीकेपीएस यादव यांच्या पथकाने शनिवारी पोलिस मुख्यालयात जाऊन प्राथमिक तपास अहवाल सादर केल्याचे सांगण्यात येत आहे.

गंभीर आरोप केल्यानंतर बिल्डर विकास मालू यांनी मौन तोडले आहे. विकासने इंस्टाग्रामवर होळीचा व्हिडीओ पोस्ट करत त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. माझे आणि सतीशचे ३० वर्षांपासून कौटुंबिक संबंध असून लोकांनी माझे नाव बदनाम करण्यासाठी कारस्थान रचल्याचे विकास मालू यांनी म्हटले आहे. प्रत्येक उत्सवात मी सतीश कौशिकला मिस करेल, असेही त्यांनी म्हटले आहे,

अंडरवर्ल्ड कनेक्शन
विकास मालूची दुसरी पत्नी सानवी हिने पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यात तिने सतीश कौशिक आणि विकास यांचा फोटो शेअर केला आहे. या महिलेचा आरोप आहे की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगा दुबईतील पार्टीत उपस्थित होता. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सानवी आणि विकास यांच्यात वैवाहिक वाद सुरू आहे. अशा स्थितीत सूडाच्या भावनेचाही तपास पोलिस करत आहेत.

Actor Satish Kaushik Death Case Underworld Connection


Previous Post

दिल्लीतील आमदारांचा पगार वाढला! आता दर महिन्याला मिळणार एवढे हजार रुपये

Next Post

समृद्धी महामार्गावरुन धावणाऱ्या नागपूर-शिर्डी बस सेवेबाबत एसटी महामंडळाने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

समृद्धी महामार्गावरुन धावणाऱ्या नागपूर-शिर्डी बस सेवेबाबत एसटी महामंडळाने घेतला हा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group