नाशिक – जीवे मारण्याची धमकी देऊन २५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना एक्सलो पॉईंट परिसरात घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी याप्रकरणी संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विरेंद्र कृष्णा सुर्यवंशी असे संशयिताचे नाव असून तो दत्तनगर येथे काकडे महाराज आश्रम शाळेजवळ राहतो. पीडित महिला १५ जानेवारीस अंबडमधील सोनाली वाईन शॉप समोरून जात असताना विरेंद्र मोटार सायकलवरून आला. त्यानंतर त्याने पीडितेला धमकावत दुचाकीवरून रुमवर नेले. येथे पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन इच्छेविरुद्ध शरीरसंबंध प्रस्थापित केले. या घटनेनंतर पीडितेने अंबड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर अंबड पोलिसांनी भादंवि ३७६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.