नाशिक : फसवणुकीच्या गुह्यात पसार झालेला एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. गेल्या पाच वर्षापासून तो गुंगारा देत होता. पण, शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने त्याला अटक केली आहे. या आरोपीच्या अटकेने म्हसरूळ पोलीसांचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. विरेंद्र विरबहाद्दूर कौशल (४२ रा.साईतिर्थ अपा.महाजन हॉस्पिटल शेजारी जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. २०१६ मध्ये म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुह्यात तो पसार झाला होता. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. युनिट १ चे कर्मचारी रविंद्र बागुल यांना मिळालेल्या माहितीनंतर त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी तो नाशिकरोड येथील बिटको पॉईंट येथे येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला असता तो पोलीसांच्या जाळय़ात अडकला. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रविंद्र बागुल.नाझीम पठाण,फय्याज सय्यद,आसिफ तांबोळी,आण्णासाहेब गुंजाळ आदीचा समावेश आहे.