नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे शहर आणि जिह्यातून नऊ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत वडाळागावातील सल्ली पॉईट भागात पोलीसांच्या जाळय़ात अडकला असून त्यास इंदिरानगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. तैय्यब बबलू पठाण (२६ रा.सावित्रीबाई फुले झोपडपट्टी,वडाळागाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत तडीपाराचे नाव आहे. युनिट २ चे कर्मचारी परमेश्वर दराडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सल्ली पॉईंट भागात संशयीत असल्याची माहिती मिळाल्याने मंगळवारी (दि.१८) पथकाने सापळा लावला असता तो पोलीसांच्या जाळयात अडकला. संशयीतास इंदिरानगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून ही कारवाई युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अभिजीत सोनवणे,हवालदार संदिप रामराजे,संजय सानप,संपत सानप,परमेश्वर दराडे व यादव डंबाळे आदींच्या पथकाने केली.