नाशिक – टागोरनगर भागातील त्रिकोणी उद्यानात चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून चोरुन नेले
नाशिक – टागोरनगर भागातील त्रिकोणी उद्यानात २८ डिसेंबरला अकराच्या सुमारास चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून चोरुन नेले. याप्रकरणी सचिन देवरे यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात चंदनाच्या झाडाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी अनेक शासकीय अधिक-यांच्या बंगल्यातून चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरुन नेले आहेत.
डीजीपीनगरला भागात विष घेऊन वृध्द महिलेने केली आत्महत्या
नाशिक – डीजीपीनगरला भागात विष घेऊन वृध्द महिलेने आत्महत्या केली. ताराबाई यशवंत पगार (वय ७८, डीजीपीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी अडीचला राहते घरी विषारी औषध घेतले. कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी सिटी केअर हॉस्पीटलमध्ये दाखल केले. पण, येथे त्यांची डॅाक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषीत केले. या घटनेची उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक – शहरात दोन दुचाकी चोरीला
नाशिक – शहरात दोन दुचाकी चोरीला गेल्या आहे. पहिल्या घटनेत शशीकांत मधुकर निर्गुन (वय ५६, जाचक मळा, जय भनाशिक
वानी रोड) यांनी त्यांची ॲक्टीव्हा दुचाकी (एमएच १५ सीएक्स ००५६) ही सोमवारी (ता.३) जानेवारीला सायंकाळी साडे पाचच्या सुमारास तोफखाना केंद्राच्या मार्गावर जैन मंदीरासमोर पार्क केली असता, चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या घटनेत रोहीत विजय दवंगे (वय ३०, कृष्ण छाया महादेव कॉलनी) यांनी त्यांची
बजाज पल्सर दुचाकी (एमएच १५ जीजे ४५५०) ही गाडी सातपूर परिसरातील सुर्या ग्रुप साल इंटरप्रायझेस समोर लावली असता चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली. सातपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.