इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अगरवाल ३ महिन्यांपासून बिगर पासींगची गाडी चालवत होता यावरुन काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आरटीओला लक्ष केले आहे. ते म्हणाले की, R.T.O रिक्षावाल्यांना पासिंग उशिरा झाली तर दिवसाला ५० रुपये दंड ठोकतोय. रिक्षावाल्यांना ३० – ३० हजार रुपये भरण्याच्या नोटीस आल्या आहेत, जो न्याय श्रीमंताला तोच गरिबाला ,RTO ची मनमानी सहन करणार नाही असे ते म्हणाले यावेळी त्यांनी गोर गरीब रिक्षावाल्याच्या पाठीशी उभा असल्याचेही सांगितले.
पुणे येथील अपघात प्रकरणात रविंद्र धंगेकर यांनी पहिले पोलिस, सरकार, डॅाक्टर यांच्यासह अनेकांना लक्ष करत जोरदार हल्ला केला आहे. त्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा आरटीओकडे वळवला आहे.