नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत निवडणूक आयोगाने २५ मे रोजी जारी केलेल्या दोन प्रसिद्धीपत्रकांचाच पुढचा भाग आहे. सध्या सुरु असलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ साठी सहाव्या टप्प्याअंतर्गत ५८ लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या निवडणुकीत ६३.३७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सहाव्या टप्प्यातील मतदानाची लिंगनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रासाठीच्या अर्ज क्र. 17 C ची एक प्रत, उमेदवारांना त्यांनी त्यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहचवली गेली आहे. अर्ज क्र. 17 C मध्ये नमूद वास्तविक माहिती मतदानाच्या दिवशीच उमेदवारांसोबत सामायिक केली जात असल्याने ही माहिती तिथून ती मिळवता येऊ शकेल, पडताळली जाऊ शकेल. टपाली पद्धतीने आलेल्या मतांची मतमोजणी झाल्यानंतरच, आणि या मतांची मतमोजणीला जोड दिल्यानंतरच मतदानाची अंतिम आकडेवारी उपलब्ध होऊ शकणार आहे. टपाली पद्धतीच्या मतांमध्ये सेवा मतदार, अबसेंटी वोटर (85+ वयाचे, दिव्यांग, अत्यावश्यक सेवा इ.) आणि निवडणूकीच्या कर्तव्यावर असलेले मतदार यांनी दिलेल्या टपाली मतपत्रिकेचा समावेश असतो. अशा प्रकारच्या प्राप्त झालेल्या टपाली मतपत्रिकांचा दैनंदिन तपशील सर्व उमेदवारांना दिला जातो.
या माहितीसोबतच येत्या 1 जून 2024 रोजी सातव्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या 57 लोकसभा मतदारसंघांतील नोंदणीकृत मतदारांचा तपशीलही देण्यात आला आहे.