नाशिक : रस्त्याच्या कडेला बसलेल्या ८० वर्षीय वृध्देच्या पिशवीतील कानातील कर्नफुले एकाने हातोहात लांबविल्याची घटना मेहर सिग्नल भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यमुनाबाई मधुकर पवार (रा.गंगावाडी,रविवारपेठ) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार या बुधवारी (दि.५) सकाळच्या सुमारास गोळे कॉलनी भागात गेल्या होत्या. पोस्ट ऑफिसच्या प्रवेशद्वाराजवळ त्या बसल्या असता मास्क लावलेल्या इसमाने त्यांची चौकशी करीत पिशवीतील सुमारे दहा हजार रूपये किमतीचे सोन्याचे कर्नफुले चोरून नेले. अधिक तपास हवालदार धारणकर करीत आहेत.