नाशिक : भाडेतत्वावरील घराची चौकशी करीत असतांना एकाने तरूणावर चाकू हल्ला केल्याची घटना कोणार्क नगर भागात घडली. या घटनेत तरूण जखमी झाला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतास पोलीसांनी अटक केली आहे. आकाश देविदास वाघ (२६ रा.पंचकृष्ण लॉन्स जवळ,कोनार्क नगर) असे चाकू हल्ला करणाºया संशयीताचे नाव आहे. या घटनेत संदिप भास्कर पोटे (३३ रा.सम्राट चंद्रगुप्त सोसा.कोनार्कनगर) हा युवक जखमी झाला असून याप्रकरणी चेतन ज्ञानेश्वर शिंदे (रा.गंगापूर कॅनोल चारी नं.७ आडगाव) याने तक्रार दाखल केली आहे. शिंदे,पोटे व सागर दंडगव्हाळ हे तिघे मित्र मंगळवारी (दि.४) रात्री भाडेतत्वावरील घराची चौकशी करण्यासाठी जखमीच्या घरासमोर गेले असता ही घटना घडली. तिघे मित्र घराची चौकशी करीत असतांना पोटे यांच्या घराशेजारी राहणाºया संशयीताने आपल्याबाबत बोलत असल्याच्या संशयातून हा चाकू हल्ला केला. संशयीताने शिवीगाळ करीत मी इथला भाई आहे असे म्हणून पोटे यांच्या पोटात धारदार चाकू खुपसून गंभीर जखमी केले. कुणी मला नडले तर त्याच्यासारखेच खुपसून टाकेण अशी धमकी देत परिसरात दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीसांनी संशयीतास अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.