नाशिक – धारदार सुरा बाळगणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई गोदाघाटावरील इंद्रकुंड भागात करण्यात आली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर राजू माळी (वय २१, शाहूनगर फुलेनगर पेठ रोड) असे संशयिताचे नाव आहे. शनिवारी (दि.२५) रात्री इंदकुंड परिसरातील सुलभ शौचालय भागात ही कारवाई केली. इंद्रकुंड भागात एक जण सुरा घेवून फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार धाव घेत पोलीसांनी संशयीतास ताब्यात घेतले असून, त्याच्या अंगझडतीत धारदार सुरा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गोरक्ष साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक आर.यू.शिंदे करीत आहेत.