नाशिक – जुने सिडको भागात लेखानगरला राहत्या घरी चक्कर येऊन पडल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यु झाला. अर्जुन भागवत काळे (वय ७०, इंदिरा गांधी वसाहत लेखानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी (दि.२२) दुपारी पावने तीनच्या सुमारास त्यांना राहत्या घरी चक्कर आल्याने बेशुध्द झाल्याने त्यांना उपचासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. पगारे यांनी तपासून मृत घोषीत केले. पोलीस हवालदार परदेशी तपास करीत आहे.