नाशिक – नानावलीत कोळीवाडा भागात सोळा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. शुभम जनार्दन सहाळे (वय १६, कोळीवाडा मानूर रोड नानावली) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. बुधवार (दि.२२) दुपारी चारला राहत्या घरी छताला लोखंडी ॲंगलने ओढणीने गळफास घेउन आत्महत्या केली. त्याचा भाऊ विशाल याने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता हा
प्रकार लक्षात आला. पोलीस उपनिरीक्षक बी.के.गवळी तपास करीत आहेत.