नाशिक : सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारणा-या दोघांना टोकल्याने त्यानी एका महिलेस जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवम सावंत व विजय सावंत (रा.दोघे श्रमिकनगर) अशी महिलेस मारहाण करणाºया संशयीतांची नावे आहे. याप्रकरणी कल्पना जंजाळ (रा.वृंदावन गार्डन सोसा.केदारनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला व संशयीत एकाच सोसायटीतील सदस्य असून पार्किंगमध्ये जोरजोरात गप्पा मारण्याच्या कारणातून हा वाद झाला. शनिवारी (दि.४) दोघे संशयीत सोसायटीच्या पार्किंगमध्ये जोरजोरात गप्पा मारत असल्याने महिलेने त्यांना येथे गप्पा मारू नका,आम्हाला त्रास होतो असे म्हटल्याने संतप्त दोघांनी महिलेस शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यावेळी आमच्या नादी लागली तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.