मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडल्या नंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या २४ तासाच्या आत दोघा आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. दुपारी त्यांना मालेगावच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले असतां न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अब्दुल मलिक यांच्यावर म्हाळदे शिवारातील जमिनीच्या वादातून हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी आरोपींची नाव गुप्त ठेवली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा पोलिस शोध घेत आहे. ज्या वेळी अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार झाला. त्यावेळी दुसऱ्या बाजूनेही गोळीबार झाल्याचे मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी स्पष्ट केले आहे. त्या दिशेने तपास करण्यात येत असल्याचे भरती यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.