नाशिक : पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव मार्गावरील सेलिब्रेशन हॉटेल समोर भरधाव दुचाकी अंधारात वळणावर उभ्या असलेल्या कारवर जावून आदळल्याने चालक महिलेचा मृत्यू झाला. अक्षदा दत्तू धुमाळ (२६ रा.मोरे मळा, हनुमानवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कारचालकाविरूध्द इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुमाळ या गेल्या सोमवारी सोबत काम करणा-या मैत्रिणीस सोडण्यासाठी पाथर्डी गाव येथे जात असतांना हा अपघात झाला. पाथर्डी फाट्याकडून दोघी मैत्रीणी पाथर्डी गावाच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना सेलिब्रेशन हॉटेल समोरील वळणावर हा अपघात झाला. अंधारात नाईट इंडिकेटर न लावता भररस्त्यात उभ्या असलेल्या एमएच १५ डीसी ६८६५ या कारवर भरधाव दुचाकी जावून आदळली. या अपघातात दोघी मैत्रीणी जखमी झाल्या होत्या. त्यातील धुमाळ यांचा मृत्यू झाला असून कारचालकाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याने हवालदार दौलत पाळदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुाहा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.