नाशिक – मित्राची मोटारसायकलची परस्पर विक्री केली; अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : मित्राला विश्वासाने दिलेल्या मोटारसायकलची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुभम सुनिल गवारे (रा.जाधव संकुल,चुंचाळे शिवार) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार केवल खैरनार (रा.रिध्दीसिध्दी अपा.आकाश पेट्रोलपंपामागे म्हसरूळ) असे संशयिताचे नाव आहे. संशयित आणि तक्रारदार एकमेकांचे मित्र असून गेल्या ५ मे रोजी संशयिताने पुणे येथे पैसे आणण्यासाठी जायचे आहे असे सांगून गवारे यांची दुचाकी एमएच १५ एचएन २१५७ विश्वासाने नेली. ती अद्याप परत केली नाही. याबाबत गवारे यांनी विचारणा केली असता तो टाळाटाळ करीत असून त्याने दुचाकी परस्पर विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
गळफास लावून आत्महत्या
नाशिक : ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना चेतनानगर भागात घडली. नाना दत्तू परदेशी (रा.चैतन्यसागर अपा.एकमुखी दत्त मंदिराजवळ) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. परदेशी यांनी रविवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पख्यांच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा प्रविणसिंग परदेशी याने त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पथवे करीत आहेत.