सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावधान! मोबाईल टॉवर उभारण्याच्या आमीषाने अनेकांची फसवणूक

by India Darpan
मे 23, 2022 | 2:26 pm
in संमिश्र वार्ता
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भ्रमणध्वनीसाठी मनोरा (टॉवर) उभारण्याच्या मोबदल्यात भरघोस मासिक भाडे देण्याचे आमीष देणारी मोठी टोळी सक्रीय झाली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्हाला कुणी ऑफर देत असेल तर सावधान. यात तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. यासंदर्भात केंद्र सरकारने गंभीर इशारा दिला आहे.

भ्रमणध्वनीसाठी मनोरा (टॉवर) उभारण्याच्या मोबदल्यात भरघोस मासिक भाडे देण्याची बतावणी करणाऱ्या व्यक्ती, यंत्रणा आणि कंपन्यांपासून जनतेने सावध राहावे, अशी सूचना दूरसंवाद विभागाने केली आहे. भ्रमणध्वनीचा मनोरा उभारण्याकरता जागा भाडेतत्त्वावर देण्याबाबत व्यवहारात दूरसंवाद विभाग किंवा ट्राय अर्थात भारतीय दूरसंवाद नियामक प्राधिकरणाचा कोणत्याही प्रकारे सहभाग नसतो. तसेच, मनोरा उभारण्यासाठी दूरसंवाद विभाग, ट्राय किंवा त्यांचे अधिकारी कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र देत नाहीत, असे दूरसंवाद विभागाने स्पष्ट केले आहे.

भ्रमणध्वनीसाठी मनोरा उभारण्यात होणाऱ्या घोटाळ्यांपासून जनतेला सावध करण्यासाठी व अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी दूरसंवाद विभागाने सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. कोणताही दूरसंवाद सेवा दाता भ्रमणध्वनीचा मनोरा उभारण्यासाठी आगाऊ रक्कमेची मागणी करीत नाही. भ्रमणध्वनीचा मनोरा उभारण्यापूर्वीच कोणत्याही स्वरुपात आगाऊ रकमेची मागणी करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कंपन्यांच्या पात्रतादर्शक बाबींची, जनतेने अत्यंत जागरूक राहून व्यवस्थित चौकशी करावी. मनोरा उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याआधी दूरसंवाद विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध टी.एस.पी./आय.पी.-1 ची वैधता तपासून घ्यावी.

अद्ययावत यादी खालील लिंकवर पहा
https://dot.gov.in/access-services/list-access-service-licences-issued
https://dot.gov.in/infrastructure-provider

अशा प्रकारच्या घोटाळ्यांची येथे करा तक्रार
अशा प्रकारचा घोटाळा लक्षात आल्यास, संबंधित प्रसंगाची स्थानिक पोलिसांकडे तक्रार करावी. दूरसंवाद विभागाच्या स्थानिक क्षेत्रीय कक्षाशी खालील पत्त्यावर संपर्क करता येईल :
जे.टी.ओ.(कॉम्प्लायन्स), केअर ऑफ वरिष्ठ उप-महासंचालक, दूरसंवाद विभाग मुंबई एल.एस.ए. 5 वा मजला, टेक्निकल कक्ष, साकी विहार टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, साकी विहार रस्ता, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400072
ईमेल – jtoc.mb-dgt-dot@gov.in, दूरध्वनी – 022-28472605
दूरसंवाद विभागाच्या स्थानिक क्षेत्रीय कक्षाशी संपर्क करण्यासाठी सविस्तर माहिती दूरसंवाद विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
https://dot.gov.in/relatedlinks/director-general-telecom

 

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक! संतप्त जावयाचे सासू, पत्नी आणि मुलीवर विळ्याने वार; सासूचा मृत्यू

Next Post

नाशिक – जळगाव येथील महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेले

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक - जळगाव येथील महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेले

ताज्या बातम्या

rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
rape

विनयभंगाच्या चार घटना… वेगवेगळया भागात दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा परिचीतांनी केला विनयभंग

जून 16, 2025
506648167 23992046913755201 4663400728654200701 n

पूल पूर्णपणे बांधलेला, पण दोन्ही बाजूंनी रस्ताच नव्हता…महेश झगडे यांची पोस्ट चर्चेत

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011