इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत रस्ता अपघाताचा बळी ठरला आहे. रुरकी येथे त्यांची कार दुभाजकाला धडकली. या अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारची काच फोडून पंत यांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्लास्टिक सर्जरी होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला रेफर केले आहे. पंत दिल्लीहून उत्तराखंडमधील आपल्या घरी परतत होते.
रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही खूप दुखापत झाली आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना दिल्लीला रेफर करण्यात आले आहे. ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला आणि पंत यांना मोठ्या मुश्किलीने कारमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना दिल्लीला रेफर करण्यात आले आहे. सक्षम हॉस्पिटलचे डॉक्टर सुशील नागर यांनी सांगितले की, ऋषभ पंतचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्या कपाळावरही जखम आहे. कपाळावर काही टाके घालण्यात आले आहेत.
https://twitter.com/tweet_sandeep/status/1608671614018916352?s=20&t=13eTNnJUHMd3IuwgRpJ7Nw
ऋषभ पंत ज्या मर्सिडीज कारमध्ये घरी परतत होता, त्या गाडीची नंबर प्लेट DL 10 CN 1717 आहे. अपघातानंतर पंत यांच्या गाडीतून काही पैसेही पडले, जे स्थानिक लोकांनी उचलले. अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतने अप्रतिम फलंदाजी केली. दुसऱ्या कसोटीत त्याचे शतक हुकले, पण त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्याने या सामन्यात भारताला आघाडी मिळाली होती. त्यामुळेच दुसऱ्या डावात महत्त्वाचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतरही टीम इंडियाने सामना जिंकला. मात्र, नुकतेच एकदिवसीय आणि टी-२० मधील खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते.
https://twitter.com/Cricketracker/status/1608671398440075266?s=20&t=13eTNnJUHMd3IuwgRpJ7Nw
Cricketer Rishabh Pant Car Major Accident Injured Fired
Luxurious Mercedes Indian Cricket Team New Delhi Road