मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुन्या काळातील एका हिंदी चित्रपटांमध्ये ‘ सुख के सब साथी दुख मे ना कोई.. ‘ असे गाणे आहे, या गाण्याची आठवण येण्याची कारण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यांनी एका घटनेच्या संदर्भात म्हटले आहे की, मला केवळ महेंद्रसिंग धोनी यांनी फोन केला आहे, बाकी कोणीही मला फोन केलेला नाही. आता त्याच्या वक्तव्यावर बीसीसीआयने प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळेच क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ उडाली आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला आशिया चषकात आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. म्हणून त्याचं सर्वत्र कौतुक होतं आहे. मागच्या झालेल्या तिन्ही सामन्यात कोहलीने चांगली फलंदाजी केली आहे. सद्या त्यांच्याकडून अधिक धावा होत असल्याने त्याची चर्चा सगळीकडे आहे. विराट कोहलीने काल एक वक्तव्य केलं आहे. त्यावर सोशल मीडियावर अधिक चर्चा देखील सुरु झाली आहे. काल रविवार, दि.४ सप्टेंबर रोजी कोहलीने पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावले. मात्र, यानंतरही टीम इंडियाला विजयाची नोंद करता आली नाही. संघाच्या पराभवानंतर कोहली पत्रकार परिषदेत आला, जिथे त्याला सामन्याबद्दल तसेच फॉर्ममध्ये परतणे आणि खराब टप्प्याबद्दल विचारण्यात आले.
धोनीबद्दल बोलताना कोहली म्हणाला, जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सोडले तेव्हा मला फक्त एका व्यक्तीकडून संदेश आला ज्यांच्यासोबत मी यापूर्वी खेळलो आहे – एमएस धोनी. अनेकांकडे माझा नंबर आहे. टीव्हीवर बरेच लोक सल्ले देतात, खूप काही सांगायला मिळाले असते पण ज्यांच्याकडे माझा नंबर आहे त्यांच्याकडून मेसेज आला नाही. कोहली पुढे म्हणाला की, धोनीसोबत माझे खास नाते आहे आणि दोघांमध्ये कधीही असुरक्षिततेची भावना नव्हती. जेव्हा एखाद्याशी खरा संबंध असतो तेव्हा एक सन्मान आणि संबंध असतो, असे दिसते. कारण दोन्ही बाजूंनी सुरक्षिततेची भावना असते. त्यांना माझ्याकडून काहीही नको आहे आणि मला त्यांच्याकडून काहीही नको आहे.
टीम इंडियाला आशिया कपमधील सुपर फोरमधील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तान संघाने भारताचा पाच गडी राखून पराभव करत मागील पराभवाचा बदला घेतला. या सामन्यात भारताचे बहुतांश फलंदाज चांगल्या सुरुवातीनंतर खराब शॉट्स खेळून बाद झाले, पण विराट कोहली एका टोकाला गोठून राहिला. त्याने 60 धावांची सुरेख खेळी खेळली आणि सलग दुसरे अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये परतल्याचे घोषित केले.
सदर सामना संपल्यानंतर कोहलीही पत्रकार परिषदेत पोहोचला आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यादरम्यान त्याने सांगितले की, जेव्हा त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले तेव्हा फक्त महेंद्रसिंग धोनीनेच त्याला मेसेज केला होता. धोनीशिवाय इतर कोणत्याही खेळाडूने वाईट काळात कोहलीशी बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता. कोहलीने यावर्षी जानेवारी महिन्यात कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. यादरम्यान त्याने गोष्टी कशा पाहतात हे देखील सांगितले. तसेच कर्णधारपदा बद्दलच्या सूचना जगासमोर दिल्या जाण्यापेक्षा कर्णधाराला वैयक्तिकरित्या दिल्यास त्या अधिक चांगल्या असतात, असेही तो म्हणाला. आत्तापर्यंत कोहलीने तीन सामन्यांमध्ये दोन अर्धशतकी पारी खेळली आहे.
आता कोहलीच्या त्या विधानावरती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं आहे, ते म्हणतात की प्रत्येकवेळी कोहलीला आम्ही मदत केली. परंतु आता तो कोणत्या विषयावर बोलत आहे आम्हाला माहित नाही. विराटला संघातील सगळ्या खेळाडूंनी मदत केली आहे. तसेच विराटला कोणी मदत केली नाही ही चुकीची गोष्ट आहे, बीसीसीआय मधील सगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला मदत केली आहे. तसेच तेव्हा शुभेच्छा ही दिल्या आहेत.
Cricket Virat Kohli Statement BCCI Reaction