बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या महिन्यात असे असेल हवामान… थंडीचा कडाका वाढेल की पाऊस पडेल? बघा, हवामानशास्त्रज्ञ काय म्हणताय…

by Gautam Sancheti
डिसेंबर 6, 2022 | 2:13 pm
in संमिश्र वार्ता
0
cold wave winter e1671450852736

 

माणिकराव खुळे, हवामानशास्त्रज्ञ
ऑक्टोबर २७ पासूनच प्रत्येकी पाच-पाच दिवसाच्या ३ आवर्तनातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात एकूण १५ दिवस शेतीच्या रब्बी पिकांना व आपणासही थंडीचा लाभ मिळाला. थंडीच्या सिझनची लवकरातली ही एक आश्चर्यजनक चांगलीच सुरवात होती. आता डिसेंबर महिन्यात हवामान कसा असेल हे जाणून घेऊया….

डिसेंबरचा अंदाज-
किमान तापमान
डिसेंबरमध्येही थंडीची चांगली सुरवात होवूनही दक्षिणेकडून नकळत अल्प आर्द्रतेचा पार २० डिग्री अक्षवृत्तापर्यन्त झालेला शिरकाव व उत्तर भारतातून पार १६ डिग्री अक्षवृत्तापर्यन्त होत असलेला थंडीचा मारा पण नंतर स्थिरावल्यामुळे ह्या आठवड्यातील आपली अपेक्षित थंडी हिरावली जात आहे. तरी देखील दीर्घावधीच्या मासिक अंदाजानुसार साधारण ९ डिसेंबर पासुन महिन्याच्या उर्वरित तीन आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे ५ च्या किमान तापमानात सरासरीपेक्षा घट होवून पडणाऱ्या थंडीची शक्यता प्रॉबॅबिलिटिच्या भाषेत ५५ % जाणवते आहे. नगर व हिंगोली जिल्ह्यात तर ही शक्यता ६५% पर्यन्त जाणवेल. म्हणून सध्याच्या चालु महिन्यात आपण चांगल्या थंडीची अपेक्षा करू या!

कमाल तापमान
दुपारी ३ चें कमाल तापमान संपूर्ण मराठवाड्यासहित नाशिक नगर पुणे सोलापूर, तसेच वर्धा, नागपूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरी इतके जाणवण्याची शक्यताही प्रॉबॅबिलिटिच्या भाषेत ५५ % जाणवते. म्हणजेच वरील ६ जिलह्यासहित मराठवाड्यात दिवसा अधिक ऊबदारपणा तर उर्वरित महाराष्ट्रात नेहमीसारखे साधारण वातावर जाणवेल.

पाऊस
एकंदरीत डिसेंबर महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस हा सरासरी पेक्षा कमी असण्याची शक्यता प्रॉबॅबिलिटिच्या भाषेत ६५% जाणवते. म्हणजेच ह्या महिन्यात एकंदरीत पाऊस नगण्यच समजावा. खरं तर सध्या अद्यापपर्यन्त व पुढेही संपूर्ण हिवाळ्यात टिकून राहणारा ‘ ला -निना ‘ व सध्या तरी तटस्थेकडे झुकलेली (भारतीय समुद्रपृष्ठभाग पाण्याच्या तापमानाची) ‘ महासागरीय द्वि- ध्रुवीता ‘ पाहता डिसेंबर मध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी असा नगण्य पावसाची शक्यता म्हणजे वातावरणाची ही नकळत विसंगतीच समजावी. कारण बहरणाऱ्या फळबागांना डिसेंबरमधील ह्या पावसाविना थंड कोरड्या वातावरणाचा जरी फायदा होत असला तरी गहू, ज्वारी हरबरा, कांदा ह्या पिकांना ह्या पावसाचा नक्कीच चांगला फायदा होत असतो. परंतु ह्या वर्षी ती शक्यता धूसरच दिसते.

आजचा अंदाज
(i)सध्या उत्तर भारतात येऊ घातलेले नवीन पश्चिमी झंझावात व दक्षिणेत ८ डिसेंबरच्या दरम्यान ता. नाडू कि.पट्टीवर आदळणाऱ्या तीव्र कमी दाब क्षेत्र (डीप्रेशन) व ह्यामुळे डिसेंबर ८ च्या दरम्यान व त्या पुढील ४-५ दिवस उत्तरेत बर्फ व पाऊस तर दक्षिणेत जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
(ii) महाराष्ट्रात येत्या २-३ दिवसात हळूहळू किमान तापमानाची घसरण होऊन ९ डिसेंबर पासून चांगल्या थंडीची अपेक्षा करू या!
महाराष्ट्रात पाऊस नाही.

Climate Forecast Weather December Month

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पिंपळाच्या पानावर बाबासाहेबांची रांगोळी; ३५ ग्रॅम रांगोळी अन तीन तासांची मेहनत

Next Post

सारंगखेडा यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Untitled 8
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यात अडीच तास चर्चा…दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार?

सप्टेंबर 10, 2025
Next Post
Sarangkheda

सारंगखेडा यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011