नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे श्री.दत्तजयंती निमित्त 7 डिसेंबर,2022 पासून एकमुखी दत्तप्रभु यांची यात्रा भरणार असून यात्रा कालावधीत अवजड वाहनांमुळे अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी 7 ते 31 डिसेंबर,2022 या कालावधीत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे 33 (एस) अन्वये या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतुक बंद करुन त्यांच्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्याचा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
यात्रा कालावधीत दोंडाईचाकडून शहादामार्गे गुजरातकडे जाणारी अवजड वाहने ही दोंडाईचा चौफुलीवरुन प्रकाशामार्गे. गुजरात राज्याकडून अक्कलकुवा-तळोदा मार्गे येणारी जड वाहने प्रकाशा पुलावरुन नंदुरबार मार्गे दोंडाईचाकडे, शहादाकडून दोंडाईचाकडे जाणारी अवजड वाहने शहादा-अनरद बारी, शिरपूरमार्गे व धुळेकडून शहादाकडे जाणारी अवजड वाहने सोनगीर फाट्यावरुन शिरपूर येथून वडाळी-अनरद बारीमार्गे शहादाकडे वळविण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Nandurbar Sarangkheda Yatra Traffic Diversion
Datta Jayanti