चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळाच्या पानावर यापूर्वी रेखाटन, पेंटिंग, कटिंग असे बरेच प्रयोग अनेकांनी केले परंतु पिंपळाच्या अवघ्या ५ इंचाच्या पानावर ४ इंच बाय ३ इंच जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारण्याचा अनोखा विक्रम चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक देव हिरे यांनी केला. ६ डिसेंबर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी हिरे यांनी अनोखे अभिवादन केले आहे. तीन तासांचे सलग प्रयत्न, स्केच न करता बोटांच्या चिमटीतून काही इंचभर जागेवर रांगोळी सोडण्याची हातोटी, बाबासाहेबांवरील अमर्याद प्रेम यातूनच ही कलाकृती जन्मल्याचं हिरे सांगतात. या कलाकृतीसाठी अवघी ३५ ग्रॅम रांगोळी लागली आहे.