इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपला भारत देश असो की परदेशातील काही ठिकाणे, येथील काही रस्ते अत्यंत धोकादायक आहेत. विशेषतः दऱ्या- डोंगरांमधून जाणारे रस्ते तर जणू काही मृत्यूशी सामना असतो. विशेषतः जम्मू-काश्मीरमधील आणि हिमालयामधील काही रस्ते. या रस्त्यावर वाहन चालवितांना वाहन चालकांची मोठीच कसरत असते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कार एका घाटात आहे. आणि या कारचालकाला या निमुळत्या रस्त्यावर कार युटर्न घ्यायची आहे. ड्रायव्हर जीव धोक्यात घालून कार यू-टर्न घेताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही कार ज्या रस्त्याने यू-टर्न घेते त्या रस्त्याची रुंदी ही कारच्या लांबीपेक्षा कमी आहे. असे असतानाही गाडीचा चालक चमत्कारिकरित्या त्याला दुसरीकडे वळवतो. वास्तविक, हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ कुठला आहे? आणि चालक कोण आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, निळ्या रंगाची कार अतिशय अरुंद डोंगरी रस्त्यावर दिसते. ती तिथे यू-टर्न घेत आहे. गाडीच्या एका बाजूला खोल दरी दिसते तर दुसऱ्या बाजूला भला मोठा खडकाचा डोंगर आहे.
The perfect 80 point turn! pic.twitter.com/bLzb1J1puU
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) January 23, 2022
या ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण जणू आपल्या मनोबलाच्या जोरावर चालत असल्याचे दिसून येते. ड्रायव्हर खूप लहान कट घेतो आणि स्टीयरिंग व्हीलसह एक्सीलरेटर, क्लच आणि ब्रेक्सचे नियंत्रण करतो. आधी तो गाडी काही इंच मागे घेतो, मग पुढे घेऊन वळतो. अचानक तो पूर्ण वळण घेतो आणि गाडी U-टर्न घेते. व्हिडिओ शेअर करताना एका ट्विटर युजरने लिहिले की, हे 80 पॉइंट टर्नचे उत्तम उदाहरण आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही जण म्हणाले की, हे खूप जोखमीचे काम आहे. मात्र, हा व्हिडिओ एडिट करण्यात आला असावा, असे मतही काहींनी व्यक्त केले आहे.