मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांची स्पर्धा कायमच चर्चेत असते. कारचे नवे मॉडेल आले की दुसऱ्या कंपनीच्या कारशी तिची लगेच तुलना केली जाते. आता बीएमडब्ल्यूच्या नव्या कारची तुलना ऑडीसोबत आहे. बीएमडब्ल्यूची ही नवी कार ऑडीला टक्कर देणार अशी चर्चा ऑटोमोबाईल क्षेत्रात होत आहे.
बीएमडब्ल्यू इंडियाने BMW X1 ही कार लॉन्च केली. ही स्पोर्ट्स एक्टिव्हिटी व्हेईकल अंतर्गत मोडणारी कार असून पेट्रोल आणि डिझेल अश्या दोन्ही प्रकारातील मॉडेल भारतात लॉन्च झाले आहेत. १.५ लीटर, तीन-सिलींडर पेट्रोल आणि २.० लीटर, चार-सिलींडर डिझेल अश्या इंजीन पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध आहे. डिझेल कार ८ ते ९ सेकंदात ताशी शुन्य ते १०० किलोमीटर वेग प्राप्त करू शकते. तर पेट्रोल कार ९.२ सेकंदात हा वेग प्राप्त करू शकते.
पेट्रोल कारची किंमत ४५.९० लाख रुपये असून डिझेल व्हेरियंटची किंमत ४७.९० लाख रुपये आहे. चेन्नईतील प्लांटमध्ये या कारची निर्मिती झाली आहे. या कारचे प्री-बुकींग सुरू झाले असून डिझेल कारची विक्री मार्चपासून तर पेट्रोल कारची विक्री जूनपासून सुरू होईल. ५० हजार रुपयांत प्री-बुकींगची व्यवस्था कंपनीने करून दिली आहे.
माय बीएमडब्ल्यू एप
कारच्या रिमोट फंक्शन्समध्ये मदत करणारे माय बीएमडब्ल्यू एप या गाडीचं वैशिष्ट्य आहे. आरामदायी वापरासाठी डिजीटल की, हार्म कार्ड ऑडियो सिस्टीम, पार्किंग आणि रिव्हर्सिंग असिस्टन्स, हाय बीम असिस्टन्स, लाईव्ह कॉकपीट अशी कितीतरी वैशिष्ट्ये या कारची आहेत. बीएमडब्ल्यूच्या या नवीन कारची लांबी ५५ मीमी, रुंदी २४ मीमी, उंची ४४ मीमी आणि व्हीलबेस २२ मीमी आहे.
BMW Luxurious X1 Car Features Price Details