इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील सगळ्यात मोठे नाव असलेल्या अंबानी कुटुंबात मंगलकार्य होत आहे. अंबानींची कन्या ईशा अंबानी हिच्या नंतर घरातील हा पहिलाच मंगल सोहळा आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा नुकताच पार पडला. लवकरच राधिका मर्चंट हिच्यासोबत तो विवाहबद्ध होणार आहे. साखरपुड्यानंतर आता त्याच्या लग्नाची तयारी सुरू झाली असून लग्नाची क्रेझ पाहायला मिळत आहे. राधिकाबद्दल नेटवरही मोठ्या प्रमाणात सर्चिंग होत असल्याचे दिसते. दरम्यान, साखरपुड्यात व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये दिसत असलेल्या अनंतच्या ब्रोचबाबत सध्या चांगलीच चर्चा रंगते आहे.
अनंत अंबानीचा साखरपुडा मोठ्या दिमाखात आणि शाही थाटात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बॉलिवूड कलाकारांनी देखील या सोहोळ्याला हजेरी लावली होती. यावेळी अनंत आणि राधिका यांच्या वेशभूषेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अबू जानी आणि संदीप खोसला या प्रसिद्ध डिझायनरने राधिकाच्या कपडे डिझाईन केले होते. साखरपुड्याच्यावेळी राधिकाने घातलेला गोल्ड सिल्क टिश्यू घागरा आकर्षण ठरला होता. दुसरीकडे अनंत अंबानीने गडद निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. कुर्त्यावर परिधान केलेल्या कोटवर ‘कार्टियर पँथर ब्रोच’ लावला होता. अनंतच्या वेशभूषेपेक्षाही त्याच्या या ब्रोचची सर्वत्र चर्चा रंगली.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यात कुत्र्याने आणली अंगठी….
असा झाला रिंग सेरेमनी सोहळा…. #AnantAmbaniRadhikaMerchant #AnantRadhikaEngagement #AnantRadhika #AnantAmbaniengagement pic.twitter.com/3tR0nskPJU— India Darpan Live (@IndiaDarpanLive) January 20, 2023
‘कार्टियर पँथर ब्रोच’ हा प्लॅटिनम किंवा सोन्यापासून तयार केला जातो. या ब्रोचला हिऱ्यांनी मढवले जाते. तर पँथरचे चमकणारे डोळे हे पाचूचे असतात. या पँथर ब्रोचची रचना कार्टियरच्या तिसऱ्या पिढीतील जॅक कार्टियर यांनी १९१४ मध्ये केली होती. या ब्रोचची किंमत १ कोटी १३ लाखांपासून १ कोटी ३२ लाखांपर्यंत असू शकते. अनंत अंबानी यांचा ब्रोचही खास तयार करून घेतलेला आहे. परंतु अनंतने घातलेल्या ब्रोचची किंमत नक्की किती हे अजून समोर आलेलं नाही. मात्र या ब्रोचची किंमतही १ कोटी १३ लाख ते १ कोटी ३२ लाखांच्यामध्ये असल्याची चर्चा आहे.
साखरपुड्याला राधिका मर्चंटचे असे झाले स्वागत
बघा शाही साखरपुडा#AnantRadhikaEngagement #AnantAmbaniRadhikaMerchant #AnantRadhika #AnantAmbaniengagement pic.twitter.com/YeGVI3oaDn— India Darpan Live (@IndiaDarpanLive) January 20, 2023
Anant Ambani Cartier Brooch Panther