इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर मुळीच भिऊ नका
तुमच्या मनावर, देहावर वा मालमत्तेवर आतून वा बाहेरून काही संकट आपोआप कोसळले किंवा कोणी मुद्दाम आणले वा आणवले असेल. मग ते तुमच्या मित्रांकडून वा शत्रूकडून वा कोणाकडूनही असेल तरीपण तुम्ही एकटे नाही आहात, तुमचा पाठीराखा कोणीतरी आहे व तो शेवटी तुम्हाला वाचवीलच हे ध्यानी बाळगा. धैर्य धरा आणि त्याला तोंड द्या. मुळीच भिऊ नका. दुःखांतही प्रेमाचा आश्रय करा. हिंमत धरा.
जे काही तुम्हाकडे येईल त्याचा, परमेश्वराकडून आलेली देणगी या भावनेने आदर करा. परमेश्वराची इच्छा काय आहे हे जाणून त्यास अनुसरा आणि त्यात तुम्हाला अभिमान वाटू द्या. जर प्रत्येक गोष्टच परमेश्वराच्या स्पर्शाने पुनीत होऊन तुमच्याकडे येत आहे, तर मग तुम्हाला अपाय करील असे या जगात काय आहे बरें ?