नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज नाशिक ते मालेगाव असा बसमधून प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत महिला सहकारी होत्या. या सर्व प्रकाराची माहिती वाघ यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
वाघ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, फक्त बोलणारे नाही, तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र गंगाधरराव फडणवीस… श्रींच्या #पादुका पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या या पवित्र #लालपरी च्या प्रवसात माऊलींना 50% सवलत देण्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये सन्माननीय अर्थमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांनी केली आणि लागलीच त्याची पूर्तता देखील झाली.
आज सकाळी नाशिकच्या ठक्कर बाजार येथून स्वतः सहकाऱ्यांसह ST ने प्रवास सुरू केला.. तिकिटावरती सवलतीची रक्कम पाहून खात्रीच पटली. प्रवासात इतर स्त्रियांशी चर्चा केली. त्यांना होणारा फायदा सांगताना चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.
महिलांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुकर करणाऱ्या या ‘लालपरी सशक्त नारी’ योजनेसाठी मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचे मातृशक्ती तर्फे मनःपूर्वक आभार
लालपरीची सवारी, महिला घेई भरारी…
फक्त बोलणारे नाही, तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व
श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस… ?श्रींच्या #पादुका पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या या पवित्र #लालपरी च्या प्रवसात माऊलींना 50% सवलत देण्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये सन्माननीय… pic.twitter.com/bGu2MYK5vf
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) March 18, 2023
BJP Leader Chitra Wagh ST Bus Travel Nashik to Malegaon