India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकात आता अदानीही करणार वीजपुरवठा; महावितरणला टक्कर की?

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील दिग्गज अदानी समूह लवकरच नाशिक शहराला वीज पुरवठा करणार आहे. तशी माहिती अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीनेच दिली आहे. सद्यस्थितीत शहरामध्ये केवळ महावितरण कंपनीचा वीज पुरवठा होत आहे. नजिकच्या काळात अदानीचीही वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नाशकात प्रथमच खासगी वीज व्यावसायिक पुरवठा सेवेत उतरणार आहे.

अदानी ट्रान्समिशनने नाशिक परिसरात वितरण व्यवसायासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड ही शाखा समाविष्ट केली आहे. नाशिक  शहरात समांतर वितरण परवाना लागू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीने १६ मार्च २०२३ रोजी ‘अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड’ (AENL) नावाने संपूर्ण मालकीची उपकंपनी समाविष्ट केली आहे. तशी माहिती अदानी उद्योग समूहाने मुंबई शेअर बाजाराला दिली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड या कंपनीची गुजरातमधील अहमदाबाद येथे १६ मार्च रोजी नोंदणी करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेडने अद्याप त्यांचे व्यवसाय कार्य सुरू केलेले नाही.

स्पर्धा निर्माण होणार की
अदानींच्या कंपनीने वीज पुरवठा सुरू केला तर नाशिक शहरात महावितरण आणि अदानी असे दोन पुरवठादार राहणार की फक्त अदानीला परवानगी दिली जाणार याबाबत काहीही स्पष्टता झालेली नाही. एकाचवेळी दोन पुरवठादार असले तर वीज पुरवठ्याच्या क्षेत्रात स्पर्धा निर्माण होईल. यातून ग्राहकाला दर्जेदार सेवा आणि किंमतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

मुंबईच्या धर्तीवर की
मुंबईमध्ये टाटा, अदानी, रिलायन्स यांच्या माध्यमातून वीज पुरवठा होत आहे. अशाच पद्धतीने आता राज्यातील विविध शहरांमध्ये वीज पुरवठ्याची सेवा देण्याचा सरकारचा मानस असल्याचे बोलले जाते. मात्र, यासंदर्भात अधिकृतपणे कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. महावितरण कंपनी प्रचंड तोट्यात आहे. शिवाय सरकारची मालकी त्यावर आहे. महावितरणचा तोटा दूर करण्यासाठी खासगी कंपन्यांना वीज पुरवठ्याचे क्षेत्र उपलब्ध करुन दिले जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

Adani Transmission has incorporated an arm, Adani Electricity Nashik Ltd, for distribution business in the Nashik area. https://t.co/5zmWe4urOE

— Business Standard (@bsindia) March 17, 2023

Adani Electricity New Company Nashik City Power Distribution


Previous Post

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्याचे प्रचंड नुकसान, शेतक-यांने सांगितली व्यथा (बघा व्हिडिओ)

Next Post

लालपरीची सवारी, महिला घेई भरारी… भाजप नेत्या चित्रा वाघांचा नाशिक-मालेगाव एसटीने प्रवास

Next Post

लालपरीची सवारी, महिला घेई भरारी... भाजप नेत्या चित्रा वाघांचा नाशिक-मालेगाव एसटीने प्रवास

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
प्रातिनिधीक फोटो

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर

March 24, 2023

गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; तब्बल ७० लाखांना गंडा

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group