इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तथा अब्जाधीश एलन मस्क आता परफ्यूम विकणार आहेत. वास्तविक, टेस्ला आणि स्पेसएक्स कंपन्यांनंतर मस्कने आता नवीन उपक्रम सुरू केला आहे. द बोरिंग कंपनी नावाच्या या उपक्रमातून ‘बर्न हेअर’ परफ्यूम लाँच करण्यात आले आहे. यासोबतच इलन मस्कने त्यांचा ट्विटर बायो देखील “परफ्यूम सेल्समन” असा अपडेट केला आहे.
या परफ्यूमची किंमत १०० डॉलर आहे. जर तुम्ही भारतीय रुपयात बघितले तर त्याची किंमत ८२०० रुपयांपेक्षा जास्त असेल. हा परफ्यूम तुम्ही क्रिप्टोकरन्सीद्वारेही खरेदी करू शकता. द बोरिंग कंपनीकडून हा परफ्यूम बाजारात आल्याने मागणीही जोर धरू लागली आहे.
एलोन मस्क यांनी ट्विट केले की १० हजार बाटल्या विकल्या गेल्या आहेत. एलन मस्क यांच्या मते हा परफ्यूम आकर्षक आहे. हा एक प्रकारचा परफ्यूम आहे जो तुम्हाला गर्दीतून वेगळे बनवेल. तुम्ही परफ्युम लावून विमानतळावरून जात असलात तरी लोकांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल.
https://twitter.com/elonmusk/status/1579971705447256064?s=20&t=Fr4OzYpiDss6pJA2bEucbw
Billionaire Elon Musk Launch Perfume