बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मराठी भाषा गौरव दिन; अनेक आक्रमणे पचवून समर्थ झालेली आपली मराठी भाषा अभिजातच ! भारत सासणे

by India Darpan
फेब्रुवारी 27, 2023 | 4:43 pm
in इतर
0
IMG 20230227 WA0215 e1677496410857

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठी भाषेवर आजवर अनेक आक्रमणे झाली, ही सर्व आक्रमणे पचवून आपली मराठी भाषा समर्थ झाली आहे. मराठी भाषा आपल्या धमन्यांतून वाहत असल्याने ती अभिजातच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, सार्वजनिक वाचनालय आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कालीदास कलामंदिरात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन श्री. सासणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, श्रीमती सासणे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आबा महाजन, संजय वाघ, प्राजक्त देशमुख आदि उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिक श्री. सासणे मराठी भाषेच्या उत्पतीबद्दल बोलतांना म्हणाले की, आपली मराठी भाषा ही २५०० वर्षे जुनी भाषा असल्याचे विविध पुरावे ८० प्राचीन ग्रंथात आढळून येतात. भाषा शास्त्रज्ञांनी २०० प्रमुख भाषांची १२ गटात विभागणी केली असून मराठी भाषा ७२ पेक्षा अधिक देशांमध्ये बोलली जाते. त्याचबरोबर २२०० वर्षापूर्वी नाणेघाटात शीलालेख आढळून आला आहे. हा शीलालेख ब्राम्ही भाषेत असून या शीलालेखावर मराठीचा उल्लेख आढळून येतो. याचाच अर्थ आपली मराठी भाषा ही प्राचीन असल्याचे सिध्द होते.

मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत बोलतांना श्री. सासणे म्हणाले की, मराठी भाषेवर सीमाभागात अनेक आक्रमणे झाली. ही सर्व आक्रमणे पचवून आपली मराठी भाषा समर्थ झाली आहे. भाषा लुप्त झाली की, संस्कृती लुप्त होते, याकरीता मराठी भाषा जपणे आवश्यक आहे. आपण मराठी भाषेविषयीचा आपल्यातील न्युनगंड काढून टाकून अभिमान बाळगला पाहिजे. तरुण पिढीत इंग्रजीचा वापर वाढलाय, तरुण वर्ग मराठी भाषेपासून दूर जात आहे. तरुणांनी इंग्रजीबरोबर मराठी भाषाही शिकली पाहिजेत. त्यांच्यात मराठीचा व्यासंग वाढण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, गणिती शब्दांना पर्यायी मराठी शब्द आणणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. शिवाय उपजिविकेसाठी मराठी भाषा आवश्यक असल्याचे तरुणांना सांगणे आवश्यक आहे. आपली मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी मराठी वाचनालये सुरु झाली पाहिजेत. तसेच मराठी शाळाही सुरु राहिल्या पाहिजेत. मराठी भाषा आपल्या धमन्यातून वाहत असल्यामुळे ती अभिजात आहेच. तीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलतांना विभागीय आयुक्त गमे म्हणाले की, कुसुमाग्रंजांच्या भूमीत आपले वास्तव्य आहे हे आपले भाग्य आहे. नाशिक शहरातील लघु नाट्यमंदिरांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील म्हणाले, एका शब्दाचे अनेक अर्थ निघणारी आपली सर्वगुणसंपन्न मराठी भाषा आहे. आपल्या वागण्यात, बोलण्यात व संस्कृतीत बदल झाले असले तरी आपलेपण जपण्यासाठी आपली मराठी भाषा जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. फडके यांनी मराठी भाषेची सध्याची स्थिती यावर आपले विचार मांडले. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्री. महाजन, वाघ, देशमुख यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्यगीताची धून वाजविण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात उपायुक्त रमेश काळे यांनी कविवर्य कुसुमाग्रज हे आपल्या सर्वांचे भूषण असून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यामागील शासनाची भूमिका विशद केली. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आबा महाजन, संजय वाघ, प्राजक्त देशमुख यांचा तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कैलास चावडे आणि सोनाली मंडलीक यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी मानले.

कार्यक्रमास उपायुक्त उन्मेश महाजन, माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, नितिन मुंडावरे, राजश्री अहिरराव, बी. जी. वाघ, धर्माजी बोडके, संजय करंजकर, श्रीकांत बेणी, जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, महसुल, जिल्हा परिषद, महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी, नागरीक, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अनोखा उपक्रम: जम्मूमधील भदेरवाह येथे स्नो मॅरेथॉन; देशभरातून १३० धावपटू सहभागी

Next Post

कांद्याच्या प्रश्नावर अनोखे आंदोलन; निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात कांदा-मिरची-पोळी खाऊन ठिय्या

Next Post
IMG 20230227 WA0237 1 e1677499050302

कांद्याच्या प्रश्नावर अनोखे आंदोलन; निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात कांदा-मिरची-पोळी खाऊन ठिय्या

ताज्या बातम्या

fir111

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मे 14, 2025
accident 11

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

मे 14, 2025
Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011