नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नाशिक जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी राजू लवटे व नाशिक जिल्हाप्रमुखपदी अजय बोरस्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे, सचिव भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते. बाल शिवसैनिक ते सह संपर्क प्रमुख असा प्रवास पाहिलेले राजू लवटे २०१४ मध्ये नाशिक पूर्व मधून विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. ज्येष्ठ जुन्या जाणत्या नेत्याकडे सह संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.
शिवसेना महानगर प्रमुख, मनपा गटनेते, मनपा विरोधी पक्षनेते अश्या विविध जबाबदारी पार पडलेल्या अजय बोरस्ते त्यांच्याकडे नाशिक जिल्हा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०१७ च्या नाशिक महानगर पालिकेची निवडणुकीच्या वेळी शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी अजय बोरस्ते यांच्या खांद्यावर होती, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्याची जबाबदारी अजय बोरस्ते यांच्या कडे सोपवली. येत्या काळात बाळासाहेबांची शिवसेनेचा भगवा संपूर्ण नाशिक शहर व जिल्ह्यात पोहचवू शिवसैनिकांचे सर्वत्र जाळे पसरवण्याचे काम करून नाशिकच्या विकासासाठी काम उभे करू. तसेच येणाऱ्या नाशिक महानगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांच्या युतीचे राज्य येईल असा विश्वास व्यक्त केला.
Balasahebanchi Shivsena Nashik Leaders Appointments
Ajay Boraste Eknath Shinde Raju Lavate Politics