इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हास्याचे फवारे, मनोरंजनाचा धमाका आणि विनोदी चर्चेतून नवनवीन खुलासे ही ‘द कपिल शर्मा शो’ ची खासियत. या शोचे खूप चाहते आहेत. या शोमध्ये वेगवेगळे कलाकार, अभिनेते, खेळाडू हजेरी लावत असतात. खूप कमी काळात हा शो आणि त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. नुकतीच या शो मध्ये हजेरी लावलेली खेळाडू भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू हिने एक मोठा खुलासा केला आहे.
प्रत्येकवेळी कपिल शर्माच्या कार्यक्रमात नवनवीन पाहुण्यांना बोलावलं जातं. त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबत व्यक्तिगत आयुष्याबाबतही चर्चा केली जाते. आतापर्यंत कपिलच्या कार्यक्रमात राजकीय, कलाकार, खेळाडू त्याचबरोबर अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. प्रत्येक वेळी नव्या पाहुण्याकडून नवा खुलासा करणं ही कपिल शर्माच्या कार्यक्रमाची खासियत आहे.
भारताची बॅडमिंटन स्टार आणि २०१६ ची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधूने रौप्य पदक जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरने तिला एक महागडी भेट दिल्याचा खुलासा केला आहे. सचिन तेंडुलकरने पीव्ही सिंधूला एक महागडी वस्तू देण्याचं आश्वासन दिलं होतं. तेंडुलकर यांनी ते पूर्ण केलं असंही तिने सांगितलं आहे.
ज्यावेळी स्पर्धा सुरु होणार होती, त्यावेळी सचिनने मला मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर पदक जिंकल्यानंतर माझ्याकडून एक महागडी कार मिळेल असंही सांगितलं होतं. ते आश्वासन तेंडुलकर यांनी पूर्ण केल्याचं सिंधू सांगते. सचिन तेंडुलकरने वीरेंद्र सेहवागला सुध्दा महागडी कार दिल्याचं सेहवागने जाहीरपणे टीव्हीच्या एका खासगी कार्यक्रमात सांगितले होते.
Badminton Player P V Sindhu Gift Sachin Tendulkar