किंग खानचं हे आलिशान घर पाहिलंत का?
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘किंग खान’, ‘बॉलीवूड बादशाह’ अशा विशेषणांनी ओळखला जाणारा शाहरुख खान हा रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. आपले हे स्थान त्याने आपल्या कामाच्या जोरावर निर्माण केले आहे. यामुळेच देशातच नव्हे तर परदेशातही त्याचे अनेक चाहते आहेत. त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीत म्हणूनच चाहत्यांना खूप इंटरेस्ट असतो. मुंबईतील शाहरुखचा बंगला तर नेहमीच चाहत्यांसाठी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असतो. आज मात्र आम्ही तुम्हाला शाहरुखच्या दिल्लीतील घराविषयी सांगणार आहोत.
‘मन्नत’ प्रमाणेच शाहरुखचे दिल्लीतील घरही चांगले ऐसपैस आहे. विशेष म्हणजे या घराची सजावट स्वतः गौरी खान हिने केली आहे. या घरातील खोल्या प्रशस्त आहेत. घरात आल्यावर एक कौटुंबिक वातावरण मिळेल याची काळजी देखील घेतलेली दिसते. यासाठीच यात प्रत्येकाच्या आवडीनिवडीची विशेष काळजी घेण्यात आली आहे. घराचा कोपरा न कोपरा उत्तम अभिरुचीने सजवण्यात आलेला दिसतो. आपल्या दिल्लीतील या घराचे फोटो शाहरुखने सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. त्यातूनच त्याची भव्यता आणि कलात्मकता लक्षात येते. या घरात शाहरुखने कुटुंबातील सदस्यांचे जुने फोटो देखील लावले आहेत. हा जणू आपल्यासाठी आठवणींचा कप्पाच असल्याची त्याची भावना आहे.
Shahrukh Khan Delhi Luxurious Home