India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

India Darpan by India Darpan
February 7, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्याला आमची कधीही हरकत नव्हती, पण आम्ही पाकिस्तानला जाणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांच्यात अलीकडेच बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली.

आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) पुढील महिन्यात आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार आहे. या स्पर्धेचे आयोजन पहिले सप्टेंबरमध्ये पाकिस्तानला करण्याचे ठरले होते. पण पाकिस्तानात न जाण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची भूमिका स्पष्ट असल्याने हा बेत रद्द करण्यात आला. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही या स्पर्धेतील महत्त्वाचे संघ आहेत, त्यामुळे सप्टेंबर २०२३ मध्ये होणारी ही स्पर्धा एसीसीने मार्चमध्ये घेण्याचा विचार केला. कारण पाकिस्तानात स्पर्धा झाल्यास भारत त्यात सामील होणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. अशात पर्यायी यजमान शोधण्याची मोहीम सुरू झाली. आता यजमानपदाच्या शर्यतीत अबुधाबी, शारजाह आणि दुबई हे तिन्ही देश आहेत.

मात्र निर्णय नाही
एसीसीने बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पण स्पर्धेच्या यजमानपदाबाबत निर्णय झाला नाही. हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. कारण पाकिस्तानात जाऊन खेळणार नसल्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे जय शहा यांनी बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान, यजमान म्हणून पाकिस्तानचे नाव सुद्धा बैठकीत आले नाही, हे विशेष.

यापूर्वीही खोळंबा
पाकिस्तानात जाणार नाही, या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ठाम असल्यामुळे यापूर्वीही अनेकदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा खोळंबा झाला आहे. केवळ भारतच नाही तर अॉस्ट्रेलिया, न्यूझीलंड या संघांनीही विविध मालिकांसाठी पाकिस्तानात जायला नकार दिला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या संघांचा सहभाग असतो.

Asia Cup 2023 Team India Pakistan Tour BCCI Stand


Previous Post

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group