India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

एक अर्ज करा आणि मिळवा थेट ५ लाखांचे कर्ज; नक्की लाभ घ्या

India Darpan by India Darpan
November 18, 2021
in वाणिज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराकरीता बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व गटकर्ज व्याजपरतावा या योजनांतर्गत कर्ज सुविध उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू व इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे असे, आवाहन नाशिक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.जी. तायडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व गटकर्ज व्याजपरतावा या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी इतर मागासवर्ग प्रवर्गातील व नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असावा. लाभार्थी व्यक्तीचे वय 18 ते 50 या दरम्यान असावे. तसेच तो कोणत्याही बँकचा थकबाकीदार नसावा व बँकेचा सिबिल स्कोर 500 पेक्षा जास्त असावा. याबरोबरच कुटूंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येणार असून, अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान किंवा अनुभव असणे आवश्यक आहे. वरील योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळाच्या नियमाप्रमाणे असणार आहे. याची अर्जदारांनी नोंद घ्यावी, असेही शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

योजनांचा सविस्तर तपशिल असा
बीज भांडवल योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 5 लाख रूपये, महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के, महामंडळाच्या कर्जावर 6 टक्के, बँकेचे साधरण व्याजदर 11 ते 13 टक्के, परतफेडीचा कालावधी 5 वर्षे असणार आहे. थेट कर्ज योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 1 लाख रूपये पर्यंत, या योजनेंतर्गत नियमितपणे दरमहा ठरविलेला हप्ता भरल्यास व्याजदर शुन्य टक्के, परतफेडीचा कालावधी 4 वर्ष असणार आहे. तसेच वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 10 लाख रूपये व गट कर्ज व्याजपरतावा योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 50 लाख रूपये पर्यंत असणार आहे. सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर नावं नोंदणी करणे अनिवार्य असून, नोंदणी केल्यानंतर कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

वरील योजनांबाबत अधिक माहितीसाठी नाशिक महाराष्ट्र राज्य इतर मागसवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जिल्हा कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0253-2236073यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही जिल्हा व्यवस्थापक एस.जी. तायडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या ५७ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

Next Post

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना काय आहे?

Next Post

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना काय आहे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर; असे आहेत सरकारचे आदेश

February 2, 2023

FPO का मागे घेतला? गुंतवणूकदारांच्या पैशांचे काय? गौतम अदानी म्हणाले…. (व्हिडिओ)

February 2, 2023

महिलेच्या घरावर दगडफेक करुन वाहनाची तोडफोड करणा-या तीन जणांना पोलिसांनी केले गजाआड

February 2, 2023

बंदी घालण्यात आलेल्या विदेशी मांगूर माश्याचे घरातील हौदात उत्पादन; ३०० किलो मासे जप्त

February 2, 2023

पेट्रोल पंपावरील कामगाराने रोकड घेवून केला पोबारा; गुन्हा दाखल

February 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशकात गोल्फ क्लब मैदानावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा विनयभंग

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group