गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नंदुरबार जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या ५७ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2021 | 3:28 pm
in राज्य
0
electiom

नंदुरबार – राज्य निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील 45 ग्रामपंचायतीमधील 57 रिक्त जागासाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आलेला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत. अक्राणी तालुक्यातील वरेखेडी बु., अक्कलकुवा तालुक्यातील कोवलीमाळ, खापर, शहादा तालुक्यातील पिंप्री, कमरावद, मलोणी, कर्जोत, सावळदा, लक्कडकोट, करजई, गोदीपूर, शिरुडदिगर, बुपकरी, पाडळदा बु., सोनवल त.बो, मनरद, कोठली त.सा, कानडी त.श, श्रीखेड, सुलतानपूर, कुऱ्हावद त.सा.,वर्ढे त.श, नागझिरी, उधळोद, सारंगखेडा, म्हसावद, विरपूर. तळोदा तालुक्यातील राजविहीर, मालदा, नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद, धानोरा, ओसर्ली, समशेरपूर, धामळोद, नाशिंदे, लोणखेडा, शिदगव्हाण, कोरीट, घोटाणे, नगांव, करणखेडा, बोराळा. तर नवापूर तालुक्यातील खोलविहीर, बंधारपाडा, निंबोणी या 45 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहील
नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा करण्याचा दि.सोमवार 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील. तहसिलदार सोमवार 22 नोव्हेंबर 2021 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करतील, नमुना ‘अ’ अ मध्ये नमूद ठिकाणी 30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार) ते 6 डिसेंबर 2021 (सोमवार) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविता व सादर करता येतील.

मंगळवार 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्र छाननी करण्यात येईल. गुरुवार 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल. गुरुवार 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.

मंगळवार 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 .30 वाजेपर्यंत मतदान होईल, तर बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्येतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील ) मतमोजणी होणार असून निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना सोमवार 27 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

जिल्ह्यात पोटनिवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. तसेच या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही, असे उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना निळ-ठुबे (महसूल प्रशासन) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुगलने भारतासाठी केल्या या घोषणा; येत्या काळात मिळणार या सुविधा

Next Post

एक अर्ज करा आणि मिळवा थेट ५ लाखांचे कर्ज; नक्की लाभ घ्या

Next Post
प्रातिनिधीक फोटो

एक अर्ज करा आणि मिळवा थेट ५ लाखांचे कर्ज; नक्की लाभ घ्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011