नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ४ सप्टेंबर २०२२ पासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील महिलांच्या राज्यस्तरीय आमंत्रितांची क्रिकेट लीग (इन्व्हिटेशन लीग) स्पर्धा नाशिक येथे सुरु होत आहेत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी ५ गटांत एकूण २० संघांत ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धेत अनन्या साळुंके नाशिक जिल्हा संघाचे नेतृत्व करीत आहे. टी-ट्वेंटी स्वरुपात खेळविल्या जाणार्या या स्पर्धेत अ गटात नाशिकसह सांगली, नंदुरबार व नांदेड चा समावेश असून नाशिक विरुद्ध सांगली सामन्याने स्पर्धेची सुरुवात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर होत आहे. दूसरा सामना नंदुरबार विरुद्ध नांदेड यांच्या मध्ये होणार आहे.
नाशिक संघ : अनन्या साळुंके ( कर्णधार ), ऐश्वर्या वाघ, शाल्मली क्षत्रिय, प्रणाली शिंदे, पल्लवी बोडके, श्रुती गीते, प्रियंका पवार (यष्टीरक्षक ), सिद्धि पिंगळे, निशी छोरिया, कार्तिकी देशमुख, हर्षाली मोरे, गौरी गुप्ता, निकिता मोरे, आस्था संघवी .
राखीव : निधी भुताला, इव्हा भावसार, कार्तिकी गायकवाड, अस्मिता खैरनार, वैभवी बालासुब्रमणीयम.
प्रशिक्षक – भावना गवळी व डॉ भाविक मनकोडी
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी या महिला संघास शुभेच्छा दिल्या आहेत.