India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘बापरे बाप आला साप!’ असे म्हणताच बोटीमध्ये उडाला गोंधळ, १७ जण पडले पाण्यात, ७ जणांचा मृत्यू

India Darpan by India Darpan
September 3, 2022
in राष्ट्रीय
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या घटनेपेक्षा अफवा अधिक भयानक असतात, त्यामुळे दुर्घटना घडू शकतात. मनुष्य हा अनेक प्राण्यांना घाबरतो. त्यापैकीच सापाला तर सर्वजणच घाबरतात. अरे बापरे साप! असे नुसते म्हटले तरी अनेक जण भीतीने अर्ध मेले होतात. साप आल्याची अफवा पसरल्याने उत्तर प्रदेशातील एक अशीच दुर्घटना घडली, ती देखील नदीतून प्रवास करणाऱ्या बोटीमध्ये. वास्तविक पाहता ती एक अफवा होती. मात्र त्यामुळे गोंधळ उडून सतरा जण पाण्यात पडले आणि त्यापैकी सात जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशमधील गाझीपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका बोटीतून 17 जण प्रवास करत होते, त्यावेळी अचानक त्या बोटीमध्ये साप शिरला. सापाबद्दल समजताच होडीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे बोटीचा समतोल ढळला गेला आणि ती पाण्यात उलटली. या दुर्घटनेत 17 जण बुडाले. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. पाच जणांचे मृतदेह हे हाती आले आहेत.
त्यानंतर गंभीर झालेल्या एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तब्येत बरी झाल्यानंतर व्यक्तीला घरी सोडण्यात आले.

बुडालेल्या काही जणांचा शोध घेण्याचं काम अजूनही सुरू असल्याचे एनडीआरएफच्या टीमकडून सांगण्यात आले. वाईट गोष्ट म्हणजे मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश असल्याचे कळते आहे. तिचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या बोट दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची आर्थिक मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

Gazhipur Accident Boat Sunk 7 Death
Uttar Pradesh Sneak


Previous Post

१६ वर्षांखालील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या सुपर लीग क्रिकेट स्पर्धा; साहिल पारख नाशिक जिल्हा संघाचा कर्णधार

Next Post

महिलांच्या आमंत्रितांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा; अनन्या साळुंखे नाशिकची कर्णधार

Next Post

महिलांच्या आमंत्रितांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा; अनन्या साळुंखे नाशिकची कर्णधार

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group